उद्धवजी सांगायचे की, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा; म्हणून...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर विश्‍वास ठेऊन भाजपमध्ये आलो असल्याचे वानखडे यांनी सांगितले.
उद्धवजी सांगायचे की, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा; म्हणून...

नागपूर : शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी आज धंतोलीतील भाजपच्या कार्यालयात सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर विश्‍वास ठेऊन भाजपमध्ये आलो असल्याचे वानखडे यांनी प्रवेश सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी राजेश वानखडे म्हणाले की, अमरावती (Amravati) लोकसभा संपर्कप्रमुख मला नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेना (Shivsena) या राजकीय पक्षाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून जुळलेलो आहे. या दरम्यान मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१९ च्या निवडणुकीत तिवसा विधानसभा शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी दिली होती. अत्यंत अल्प मताच्या फरकाने माझा पराभव झाला. या निवडणुकीत मला शिवसेना भाजप तसेच सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी भरघोस मदत केली. सन २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले.

ऐन वेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक अभद्र आघाडी जन्माला आली आणि याच सोबत भारतीय जनता पक्षाशी असलेले पूर्वापार संबंध संपुष्टात आले. जे कोणत्याही शिवसैनिकाला पटणारे नव्हते. त्यामुळे याच अभद्र युतीमुळे अनेक शिवसैनिकांची मने दुखावली गेलीत. आणि तेथूनच पक्षात नाराजीचा सुर सुरू होऊन पतनाची सुरवात झाली. अनेकदा मी या वेदना सहन होत नसल्याने मातोश्रीवर त्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे कुणीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शिवसैनिकांची कोणतीही कामे होत नव्हती आणि मुख्यमंत्र्यांची देखील भेट होत नव्हती.

गावागावांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते कार्यकर्ते आणखी मजबूत होत चालले होते. अशा गंभीर परिस्थितीत अशा अनेक समस्या आणि वेदना शिवसैनिकांच्या मनात खदखदत होत्या. आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांची पक्षात आणखी घुसमट वाढत गेली. त्यात भरीस भर म्हणून सतत पक्षश्रेष्टीकडून तत्कालीन काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा, असे सांगण्यात येत होते. परंतु मी आणि माझे सहकारी हिंदुत्वाचे पाईक शिवसैनिक असल्यामुळे ते शक्य नव्हते. सामान्य शिवसैनिकांच्या वेदना माझ्याकडून पाहिल्या जात नसल्याने त्यांना न्याय देण्यासाठीच मी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू विचारसरणीशी पूर्वापार संगत असलेल्या भारतीय जनता पक्षात आजपासून राजकीय जीवनाची सुरूवात करीत असल्याचे वानखडे म्हणाले.

उद्धवजी सांगायचे की, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा; म्हणून...
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप...

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पक्षात माझ्या समर्थकांसह प्रवेश करीत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आहे. या सरकारच्या माध्यमातून तिवसा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. संपूर्ण भारत देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना यात आपल्या जिल्ह्याचा व तिवसा विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी आपल्याला या माध्यमातून प्राप्त होणार आहे, असेही राजेश वानखडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com