उद्धवजी, ती शस्त्रक्रियेची गुंगी नव्हती, तर सत्तेची धुंदी होती…

३१ महिन्यांच्या कार्यकाळामध्ये मंत्र्यांनी वसुलीच्या पलीकडे काही केलेच नाही. याच आरोपांवर त्यांच्या सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये खितपत पडलेले आहेत, असे ॲड. मेश्राम (AD. Dharmpal Meshram) म्हणाले.
Ad. Dharmpal Meshram and Uddhav Thackeray
Ad. Dharmpal Meshram and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस मी त्या गुंगीत होतो आणि त्याचाच फायदा घेऊन महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यात आले, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर उद्धवजी, ती शस्त्रक्रियेची गुंगी नव्हती, तर सत्तेची धुंदी होती, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम (Ad. Dharmpal Meshram) यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतला.

संजय राऊत यांनी घेतलेली ती मुलाखत म्हणजे खरंच मुलाखत होती, अनौपचारिक चर्चा होती की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, त्याप्रमाणे ती फिक्स्ड मॅच होती, ही शंका माझ्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra) १२ कोटी जनतेला निश्‍चितपणे आली आहे. कारण ठाकरेंनी त्यांच्या ३१ महिन्यांच्या कार्यकाळामध्ये मंत्र्यांनी वसुलीच्या पलीकडे काही केलेच नाही. याच आरोपांवर त्यांच्या सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये खितपत पडलेले आहेत, असे ॲड. मेश्राम म्हणाले.

सत्तेची धुंदी आणि मदमस्तपणा तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांमध्ये वाढला होता. या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत बोलताना ‘उपरवाले की मेहेरबानी’, असंही ते बोलले. हे मात्र त्यांचे बोलणं अगदी खरं आहे. कारण फडणवीसांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त आहे. येवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील परमेश्‍वररुपी १२ कोटी जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून कोरोनासारख्या जागतिक महामारीला सामोरे जाताना, ओल्या, कोरड्या दुष्काळात शेतांतील बांधांवर जाताना ते दोन वेळा कोरोनाला सामोरे गेले आणि फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये नव्हे तर सरकारी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर संघर्ष करून या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली.

उपमुख्यमंत्रिपदाचा वापर त्यांनी महाराष्ट्रातील गोर, गरीब, दलित, शोषित, पिडीत जनतेसाठी करण्याचा विडा उचलला आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे फडणवीसांवर ‘उपरवाले की मेहेरबानी’ आहे. ठाकरेंच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये भावनात्मकता, भावविव्हळता यापलीकडे काहीही नाही. निव्वळ भावनात्मक होऊन सरकार चालवता येत नाही, हे आतातरी उद्धव ठाकरेंनी ध्यानात घ्यावे. शिवसेनेमध्ये ज्यांना उद्धव ठाकरेंना दाबून ठेवले, त्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी ठाकरेंच्या पायाखालचे रेड कार्पेट सरकवलेच नाही तर उलथवून लावले, असे ॲड. मेश्राम म्हणाले.

Ad. Dharmpal Meshram and Uddhav Thackeray
आमचे नेते एकनाथ शिंदेच आणि राज्यात एकच मुख्यमंत्री : फडणवीस यांनी केले स्पष्ट

भाजपसोबत निवडणूकपूर्व युतीला नाकारून ठाकरेंनी महाविकास आघाडी तयार केली. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. त्या युतीतूनच सेना आणि भाजपचे आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार तोच तुम्ही नैसर्गिक युती तोडून अनैसर्गिक आघाडी केली. त्यामुळे तुम्हाला सोडून गेलेल्या आमदार, खासदारांना राजीनामा मागण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, असा सल्लाही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in