तर उद्या कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचेही तुकडे करतील; ठाकरेंचा केंद्रावर गंभीर आरोप

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : ' छत्रपतींचा आपमान सुरू आहे. गुजरातमध्ये निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग तिकडे वळले, कालपरवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बोंबललेत. त्यांनी तर सोलापूरवरच हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निडणुका आहेत. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले तसेच महाराष्ट्राचे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. 'मिंदे मुख्यमंत्री सांगतील, अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू, पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो, असा सणसणीत टोला, उद्धव ठाकरेंनी लगावला. ''महत्त्वाचा मुद्दा आहे. इकडचे उद्योग न्यायचे आणि महाराष्ट्र कंगाल करायचा. इथे बेकारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचे आणि छत्रपतींचा अवमान करून आदर्शांवर टीका करायची.

Uddhav Thackeray News
'एक फुल दोन फाप' म्हणत संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

सोलारावर हक्क सांगितल्यानंतर आपल्या पंढरपुरचा विठोबा कर्नाटकात जाणार का? आपल्या वारकऱ्यांनी तिकडे जाऊन दर्शन घ्याचे का, असा सवाल त्यांनी केला. या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरुनही त्यांनी टीका केली.

Uddhav Thackeray News
तुमचे भविष्य ज्योतीशाला विचारुन उपयोग नाही; कारण ते दिल्लीत ठरते : ठाकरेंचा शिंदेंना टोला

यावेळी ठाकरे म्हणाले, काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आमचे ४० रेडे तिकडे गेले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. नंतर अयोध्येला गेलो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवण्यासाठी गेले होते. ज्याचे भविष्य त्यांना माहीत नाही ते आपले भविष्य ठरवणार. तुमचे भविष्य ज्योतिषाला दाखवून उपयोग नाही. तुमचे भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत आहेत, अशा टोला ठाकरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com