उद्धव ठाकरेंची सेना संपणार अन् एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार !

प्रवीण राऊत या घरांचे विकासक होते आणि त्यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या बॅंक खात्यावर मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण झालेली आहे, असे आमदार डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) म्हणाले.
MLS Dr. Parinay Fuke
MLS Dr. Parinay FukeSarkarnama

नागपूर : संजय राऊतांना कोणत्या प्रकरणात अटक झाली, हे सर्वांना माहिती आहे. पत्रा चाळीचे ते प्रकरण आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैहव्यवहार झालेले आहेत. तेथे ६३८ परिवार राहात होते. त्यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत आला आहे. या अन्यायाच्या विरोधात तक्रारी झाल्या. प्रवीण राऊत या घरांचे विकासक होते आणि त्यांच्या खात्यातून शिवसेना नेते आणि खासदार यांच्या बॅंक खात्यावर मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण झालेली आहे, असे आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांचे हात पत्राचाळ प्रकरणात गुंतलेले आहेत आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांच्या जेव्हा लक्षात आले, तेव्हाच कुठे ही कारवाई झाली आहे. ही कारवाई झाल्यानंतर भारतीय जनता पक्षावर (BJP) आरोप केले जात आहेत, याबाबत विचारले असता आरोप करणारे भाजपचे विरोधक आहेत आणि विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, असे ते म्हणाले. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कारण ईडीचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे आमदार डाॅ. फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी सांगितले.

विकासक प्रवीण राऊत यांच्या बॅंक खात्यातून संजय राऊत यांच्या खात्यात पैसै गेले आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यावरही पैसै ट्रान्सफर करण्यात आले आहेत. संजय राऊतांकडे कोट्यवधी रुपयांची बेहोशोबी मालमत्ता आहे, हे सर्व ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ईडीची कारवाई चुकीची नाही. ही कारवाई करण्यापूर्वी ईडीने राऊतांना वारंवार कार्यालयात बोलावले. पण नेहमी काही ना काही कारणे सांगून ते चौकशीसाठी सहकार्य करीत नव्हते. त्यामुळे अखेरीस त्यांना अटक करण्यात आली, असे आमदार फुके म्हणाले.

देशातील सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष राहील, अशा आशयाचे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारच्या पटनामधील एका कार्यक्रमात केले. याबाबत विचारले असता. त्यांनी केलेले विधान मी अद्याप पाहिले नाही, ऐकले नाही. पण तरीही महाराष्ट्रातून शिवसेना संपणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपणार आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी एकनाथ शिंदे यांची सेना निश्‍चितपणे राहणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेची झालेली ही युती राहणार आले, असे डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in