Bawankule : उद्धव ठाकरे उद्या समाजवादी पार्टी किंवा ओवेसींसोबतही युती करतील...

आताही २० ते २५ आमदारांचे छुपे समर्थन आमच्या सरकारला आहे. त्यामुळे आता मध्यावधी निवडणुका होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीचे संख्याबळ नेहमीच कमी होत गेले आहे. जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांचे काही लोक अनुपस्थित राहिले, तर काही आपआपल्या कामांनी निघून गेले. कारण त्यांना माहिती होतं की, हे बहुमत सिद्ध होणे नाही आणि आताही २० ते २५ आमदारांचे छुपे समर्थन आमच्या सरकारला आहे. त्यामुळे आता मध्यावधी निवडणुका होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

आमचे सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. त्यामुळे कुणीही काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. २०२४मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेला उमेदवारही मिळणार नाही, अशी स्थिती येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. त्यांना केंद्रातील भाजप नेत्यांची साथ आहे, या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, अजिबात नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यासह आमचे सर्व नेते शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करत आहे आणि ज्या दिवशी राज्यपालांनी ते वक्तव्य केलं, त्याचे समर्थन कुणीही करत नाहीये.

ज्या प्रदेशांत निवडणुकी असतात, तेथे आम्ही प्रचाराला जातो. गुजरातच्या गेल्या २७ वर्षांच्या इतिहासामध्ये भाजपचे सरकार आहे आणि यावेळी १४५पेक्षा जास्त जागा तेथे निवडून येतील. कारण तेथे विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाहीये, असे बावनकुळे म्हणाले. शिंदे गटाच्या गुवाहाटीला जाणाऱ्या नेत्यांना संजय राऊत यांनी रेडे असे संबोधले. राज्यात सद्यःस्थितीतील आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ज्या दिवशी त्यांना धनुष्यबाण चिन्ह दिले आणि ते निवडून आले, तेव्हा ते निष्ठावान शिवसैनिक होते आणि उद्धव ठाकरेंच्या हुकूमशाहीविरोधात त्यांनी बंड केले, तर त्यांना रेडे म्हणणे योग्य नाही. एक आमदार साधारणतः ५ लाख लोकांमधून तर खासदार २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना रेडे म्हणणे म्हणजे लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा अपमान आहे. असे बेताल बोलण्यापेक्षा जनतेला मान द्या आणि आपला पक्ष सांभाळा, असा सल्ला बावनकुळेंनी संजय राऊतांना दिला. संजय राऊतांचे बरळणे असेच सुरू राहिल्यास त्यांच्याकडे चार लोकांच्या व्यतिरिक्त कुणीही दिसणार नाही, असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Karad : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठी फाटाफुट होणार : बावनकुळे यांचे भाकित

उद्धव ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती करून मुंबईत भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याबाबत विचारले असता, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर तयार झालेली शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या शिवसेनेला मूठमाती देण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आता काहीही करू शकतात. उद्या ते समाजवादी पार्टी, अबू आझमी किंवा असदुद्दीन ओवेसींसोबत बैठका घेऊन युती करू शकतात. मताच्या राजकारणासाठी ते आता कुठल्याही पातळीला जाऊ शकतात, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in