Uddhav Thackeray : फडणवीसांच्या नागपुरात का पेटली नाही उद्धव ठाकरेंची मशाल ?

Fadanvis : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात गर्जना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.Sarkarnama

Uddhav Thackeray Shivsena News : उद्धव ठाकरे गटातर्फे आजपासून राज्यभर शिवगर्जना केली जाणार आहे. विदर्भातही शिवसेनेचे नेते यासाठी येणार आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये ३ मार्चला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवगर्जना कार्यक्रम घेणार आहेत. पण नागपूर शहरात मात्र अजूनही सर्वत्र सामसूम आहे. याचे कारण काय, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेनेतील बंडानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गमावल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शिंदे सेना-भाजप युतीचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात गर्जना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र नागपूर ग्रामीणमध्ये तीन तारखेला खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवगर्जनेचा कार्यक्रम होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार बाहेर पडले. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. याचे सर्व खापर महाविकास आघाडीतर्फे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे. आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार व पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी नागपूरसह विदर्भात बैठकांचा धडाका लावला होता.

विदर्भातील पुन्हा शिवसेनेला जिवंत करण्यासाठी सर्व जागा लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. भाजपला जागा सोडल्यामुळे शिवसेना विदर्भात कमजोर झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. शिवसैनिकाला पुन्हा जागृत करण्यासाठी आपण वारंवार येऊ, असे ते सांगून गेले होते. दोन बैठकांनंतर त्यांनी विदर्भात येणे बंद केले. या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष हिरावून घेण्यात आला. सोबतच धनुष्यबाणही गेले. त्यामुळे शिवसेना चांगलीच संतापली आहे.

Devendra Fadanvis and Uddhav Thackeray.
Shivsena News: नागपुरातील शिवसेना भवनाचे भाडेच भरले नाही, अन् उद्धव ठाकरे म्हणतात लढा !

संघटना पुन्हा उभी करण्यासाठी राज्यपातळीवर शिवगर्जना कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे शहर असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सेनेमार्फत सर्वाधिक गर्जना केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. नागपूर ग्रामीण, वर्धा, गोंदिया, भंडारा येथील शिवगर्जनेचे कार्यक्रम ठरले आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये तीन तारखेला माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवगर्जनेचा कार्यक्रम होणार आहे.

पदाधिकाऱ्यांनाच काही माहीत नाही..

नागपूर (Nagpur) शहरात सर्वत्र सामसूम आहे. जिल्हा प्रमुख (District Chief) व शहर प्रमुखांना अद्याप या कार्यक्रमाची कल्पना नाही. काही ठरल्याचेही त्यांच्या कानावर नाही. त्यामुळे ठाकरेंची (Uddhav Thackeray) मशाल अद्याप नागपुरात पेटलेली नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी थेट पंगा नको, म्हणून नागपूर शहरात शिवर्जनेचा भोंगा बंद ठेवण्यात आला, हे एक कारण त्यामागे असू शकते. मात्र खरं काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com