Uddhav Thackeray कडाडले; भाजपने टाकली गुगली, शिंदे गट अडचणीत !

Shambhuraj Desai : शंभुराज देसाई यांनी सोमवारी ठराव आणण्याची घोषणा केली होती.
Uddhav Thackeray, Devendra Fadanvis and Eknath Shinde
Uddhav Thackeray, Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Assembly Winter Session : एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार सीमावादावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घोषणा केल्याप्रमाणे सोमवारी विधासभेत ठराव आणता आला नाही. मुख्यमंत्र्यांना सोमवारी अचानक केंद्राने दिल्लीला बोलावले. यामुळे भाजपच्या गुगलीमुळे शिंदे गटाची अडणच झाल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटातील नेते उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desi) यांनी सोमवारी ठराव आणण्याची घोषणा केली होती. ती फोल ठरली आहे. ही संधी साधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधान परिषदेत चांगलेच कडाडले. शिंदे गटात गेलेल्या आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकमधील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात (Maharashtra) सामिल करण्यासाठी कारावास भोगल्याचे शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सांगून त्यांचीही भूमिका याबाबत आक्रमक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दोन्ही राज्यांची बैठक झाली असून सामंजस्याने प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना केल्या. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य न करण्याचा सल्लाही दिल्याचे समजते.

दुसरीकडे कर्नाटक सरकारने एक इंचही जागा देणार नसल्याचा ठराव घेऊन महाराष्ट्राला डीवचण्याचे काम केले. कर्नाटक सरकार विरोधात उघड भूमिका घेत असताना महाराष्ट्र सरकार गप्प असल्याचा आरोप करीत विरोधकांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील निवडणुकांवर डोळा ठेऊन हे राजकारण होत असल्याची चर्चा आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. या प्रकरणावर भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात आल्याचे दिसत नाही. मराठी भाषिकांचा मुद्दा असल्याने शिंदेसह ठाकरे गटासाठी हा महत्त्वाचा आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून याबाबत ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आठवड्यात तो आला नाही.

Uddhav Thackeray, Devendra Fadanvis and Eknath Shinde
Washim जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे यश दोन्ही आमदारांना विचार करायला लावणारे...

त्याच मुद्यावर ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले. त्याला मात देण्यासाठी शिंदे गटातील नेते उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना सोमवारी ठाराव आणण्याची घोषणा केली होती. मात्र सोमवारी सकाळीच केंद्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुकारा करण्यात आला. दिल्लीतून सायंकाळी आल्यावर त्यांच्याकडून ठराव मांडण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. परंतु ते येण्यापूर्वीच सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे त्यांना ठराव मांडता आला नाही. भाजपच्या परवानशिवाय शिवाय ठराव मांडता येणार नाही, असा यातून संदेश देण्याचा प्रयत्न केल्या गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com