Uday Samant News: उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले एअरबस आणि वेदांता महाराष्ट्राबाहेर जाण्याचे कारण !

Government : समतोल विकास होण्यासाठी सरकार मेहनत करीत आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Airbus and Vedanta Project: महाराष्ट्रात १९६५ साली एमआयडीसी स्थापना झाली. त्याची वर्गवारी ए बी सी डी आणि डी प्लस अशी करण्यात आली. ६६ हजार २७३ हेक्टर जमीन एमआयडीसीने घेतली आहे. १९ टक्के जमिन कोकण आणि पुणे विभागात आहे. परंतु ७७ टक्के गुंतवणूक या दोन विभागात केली. यामध्ये समतोल का साधला गेला नाही, असा प्रश्‍न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधान परिषदेत केला.

उत्तर महाराष्ट्रात १९ टक्के क्षेत्र असताना देखील केवळ ५ टक्के गुंतवणूक झाली आहे. एकूण रोजगार निर्मितीच्या ७ टक्के जमीन विदर्भात असतानाही तेथे फक्त १२ टक्के गुंतवणूक झाली आणि १० टक्के रोजगार उपलब्ध झाला आहे. मराठवाड्यात २१ टक्के जमीन असताना ६ टक्के गुंतवणूक आहे आणि रोजगार निर्मिती ६ टक्केच झाली.

महाराष्ट्रातील ३४ पैकी २६ जिल्हे कृषीप्रधान आहेत. १९६४ पासून वर्गवारी केली. तेव्हापासून किती एमआयडीसी प्रगती करून वरच्या वर्गात आल्या, असाही प्रश्‍न तांबे यांनी केला. समतोल विकास होण्यासाठी सरकार मेहनत करीत आहे. दावोसला झालेल्या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटीचे एमओयू केले. ते राज्यात एका ठिकाणी नाहीत. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, कोकण सर्वत्र हे उद्योग आहेत.

तरूण पिढीला रोजगार मिळावा, असा प्रयत्न आहे. विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे हे डी प्लस वर्गामध्ये टाकले आहेत. त्यांना इन्सेंटीव्ह दिले जाते, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले, त्याबाबत वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या जातात. वेगवेगळी माहिती दिली जाते. त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेतून दिलेली माहिती खरी आहे का, असे निरंजन डावखरे यांनी विचारले.

Uday Samant
Uday Samant News : संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले...

एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पांवरच पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. वेदांता सेमी कंडक्टर प्रकल्प होता. फॉक्सकॉने मोबाईल (Mobile) इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न केला होता. पण फॉक्सकॉन महाराष्टात (Maharashtra) येणार नाही, हे तत्कालिन उद्योगमंत्र्यांचे विधान होते, असे उदय सामंत म्हणाले.

त्याच वर्षी मार्च महिन्यात पहिली हायपॉवर बैठक झाली. वेदांताचा अर्ज असतानासुद्धा आम्ही त्यांना काय सुविधा देणार यावर चर्चा झाली नाही. त्यानंतर १५ जुलैला हायपॉवर बैठक झाली. तेव्हा उपमुख्यमंत्री फॉक्सकॉनचे मालक अनिल अग्रवाल यांना भेटले. त्यांनी सांगितले की बैठकच झाली नाही. त्यानंतर तो प्रकल्प गुजरातला गेला. एअरबसची नोंद नाही. सॅप्रॉन आधीच दुसरीकडे सुरू केला होता, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले. याशिवाय ४००० कोटीचा पीडीपीचा प्रकल्प रायगड मध्ये होतो आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com