
अभिजीत घोरमारे
गोंदिया : कोरोना महामारीचा (Coronavirus) संसर्ग ओसरल्यानंतर राज्यभरात पुर्वीप्रमाणे शाळा महाविद्यालये सुरु झाली. दोन वर्षांच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने (Offline Exams) परीक्षा सुरु झाल्या. मात्र १० वीच्या परीक्षेत चक्क सामुहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 10 वी च्या परिक्षेच चक्क सामूहिक कॉपीचा केल्याचा एक व्हिडीओ समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळाच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी सहकार्य करत असल्याची बाबही समोर आली आहे.
ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शुट केला आहे, त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 24 मार्चला गणिताचा पेपर सुरु होता. यावेळी शाळेतील काही शिक्षक आणि कर्मचारीच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास साहाय्य करत करत होते.
आश्चर्याची बाब म्हणजे शाळा प्रशासनच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी सहाय्य करत होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचे साहित्य लपवून ठेवण्यात आले होते. आवश्यकतेनुसार एक एक विद्यार्थी कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तिथे जाऊन कॉपी घेऊन येत होता. तसेच या कामासाठी या स्वतंत्र खोलीत एक कर्मचारीच नियुक्त करण्यात आला होता.
दरम्यान, गोंदिया शिक्षण विभागाला संबंधित कॉपी प्रकाराची तक्रार करुनही स्थानिक प्रशासनाने अद्याप शाळेवर आणि शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली नाही, अशी तक्रार संबंधित पालकाने केली आहे. तसेच, शाळेच्या या प्रकारामुळे आपल्या हुशार पाल्याचे नुकसान होत असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या प्रकरणावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.