Dhanorkar : बल्लारपूर दुर्घटनेप्रकरणी दोघे निलंबित; खासदार धानोरकरांनी केली होती मागणी..

Ballarpur : या अपघाताला जबाबदार असलेल्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

Ballarpur Railway Bridge Accident : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातात (Accident) इतर लोक जखमी झाले होते. या अपघाताला जबाबदार असलेल्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी तशी मागणी केली होती.

रेल्वे (Railway) विभागाने इन्स्पेक्टर (Inspector) ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना निलंबित केले आहे. बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे खासदार धानोरकर यांनी केली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर ओवर ब्रीज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव होते.

मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीदेखील मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर म्हणतात, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या...

यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. यापुढे अशा दुर्घटना होणार नाहीत, याचीही खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com