Buldhana Accident|एसटीच्या तुटलेल्या पत्र्याने दोघांचा हात तुटला, तिसरा गंभीर जखमी

Buldhana Accident| आज सकाळी ६ वाजता मलकापूर आगारातून ही एसटी निघाली होती.
Buldhana Accident|
Buldhana Accident|

मलकापूर : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या तुटलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून कापला गेल्याची घटना घडली आहे. आज (१६ सप्टेंबर) सकाळी मलकापूर-पिंपळगांव देवी रस्त्यावर हा अपघात घडला आहे. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असं या दोन्ही तरुणांची नावे आहेत.

या अपघातात दोन्ही तरुणांचे हात अक्षरश: तुटले आहेत तर तिसऱ्याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. या दोन्ही तरुणांवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिसऱ्या तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव खान्देश येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Buldhana Accident|
प्रशांत किशोर यांच्या सोबत आशिष देशमुख नव्याने उभारणार स्वतंत्र विदर्भाची चळवळ !

मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी ६ वाजता मलकापूर आगारातून ही एसटी निघाली होती. पण फक्त २० मिनिटातच धावत्या एसटीच्या मागील बाजूने बाहेर आलेल्या पत्र्याने मोटारसायकलवर आलेल्या गणेश शंकर पवार यांच्या हाताला जबर दुखापत झाली. त्यातही एसटी पुढे आल्यानंतर एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्याने सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या विकास पांडे (वय २२) याचा हात कापला गेला. इतकेच नव्हे तर त्याच्या डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या.

एसटी धावत्या एसटीच्या पत्र्याने परमेश्वर पाटील (वय ४५ ) यांचाहही हात कलम झाला. त्याचवेळी त्यांच्या पोटालाही गंभीर जखमा झाल्या. पाटील यांनाही खान्देशातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक द्वय सुखदेव भोरकडे आणि बालाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी एसटी स्थानकात कारवाई सुरु केली.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली. आगारप्रमुख दादाराव दराडे यांना आगारात बोलावून घेत त्यांच्या समोरच कार्यालयाची तोडफोड केली. संतापलेल्या आगारप्रमुखांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर चालकाने एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये उभी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in