Ravikant Tupkar म्हणाले, पंचनाम्याची औपचारिकता करू नका; हेक्टरी ५० हजार द्या !

रविकात तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व दुष्काळाची दाहकता त्यांच्या लक्षात आणून दिली.
Ravikant Tupkar and Devendra Fadanvis
Ravikant Tupkar and Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : अतिवृष्टीमुळे विदर्भासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सरकारकडून अद्याप पूर्ण पंचनामे झाले नाहीत. नुकसान भरपाईची कोणतीही ठोस घोषणा सरकारकडून झाली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुंबई (Mumbai) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली व दुष्काळाची दाहकता त्यांच्या लक्षात आणून दिली. यावर्षी पेरणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणेही अवघड झाले होते. अशातच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी (Farmars) आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे सरकारकडून बळीराजाला मदत मिळणे गरजेचे आहे. तरी पंचनाम्याची औपचारिकता न करता सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी तुपकरांनी फडणवीस यांच्याकडे केली.

परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला आहे. तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल, त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणीही केली जात आहे.

Ravikant Tupkar and Devendra Fadanvis
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत आहे आणि सरकारच्या मदतीकडे आशेने बघत आहेत. त्यामुळे आता पंचनाम्याचे सोपस्कार करण्याच्या भानगडीत न पडता हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in