
Ravikant Tupkar News : सत्ताधाऱ्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या सांगण्यावरुन आत्मदहन आंदोलन दडपले. अगदी नक्षलवाद्यांसारखी वागूणक देण्यात आली, जेलमध्ये टाकले. परंतु तरीही आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यासांठीची लढाई सुरुच राहणार असल्याचे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.
पुढच्या महिन्यात जिजाऊंचे दर्शन घेऊन आधी जिल्हाभर यात्रा काढणार आणि नंतर राज्यात यात्रा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. मला राजकीय जीवनातून संपविण्याचा कट असून माझ्या जिवाला धोका असल्याचे तुपकर यांनी सांगितले. सरकारने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर हेतुपुरस्सरपणे चुकीचे गुन्हे दाखल केले. तुपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आत्मदहन आंदोलनात झालेल्या अन्याय कथन करण्यासह पुढच्या महिन्यात काढल्या जाणाऱ्या यात्रेची माहिती दिली.
लाठीचार्ज पूर्वनियोजित होता..
न्याय मिळत नसल्याने आत्मदहन आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात पोलिसांच्या वेशात नव्हे तर फक्त खाकी कपड्यांमध्ये आलो होतो. अंगावर डिझल घेतल्यावरही पोलिसांनी ताब्यात घेणे, अटक करणे, दवाखान्यात नेणे, यांपैकी कोणताच निर्णय न घेता दोन तास उन्हात बसवून ठेवले. काही पोलिसांनी त्यांच्या ओळखीतील कार्यकर्त्यांना लवकर निघा, असे म्हणत लाठीचार्जचे संकेत आधीच दिले. यावरुन पोलिसांची लाठीजार्च हा पूर्वनियोजीत होता असे दिसून येते, असे तुपकरांनी सांगितले.
पोलिसांनी काहींना मुद्दामहून शिविगाळ करुन, दादागिरी करुन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही तुपकरांनी केला. एकदा मारहाण झाली, तुरुंगात टाकले की पुन्हा आंदोलन करणार नाही, असा सत्ताधाऱ्यांचा आणि पोलिसांचा समज कदाचित झाला असावा. परंतु आम्ही थांबणार नाही. सत्ताधाऱ्यांनी आणि पोलिसांनी किती अन्याय केला, हे आता जिल्हाभर यात्रा काढून गावागावात सांगणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.
न्यायालयाने (Court) काही दिवस अंदोलन करण्यास मनाई केली आहे, शिवाय पोलीस (Police) ठाण्यातही काहीकाळ नियमित हजेरी द्यायची आहे. म्हणून काही काळ थांबून पुढच्या महिन्यात सिंदखेड राजा येथे जिजाऊंचे दर्शन घेऊन यात्रा सुरु करणार असल्याचे तुपकरांनी (Ravikant Tupkar) सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. शर्वरी तुपकर, स्वाभिमानीचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, दत्तात्रय जेऊघाले, भागवत धोरण, विजय बोरडे, शाहीर विक्रांत राजपूत आदींची उपस्थिती होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.