Bachchu Kadu : 1 नोव्हेंबरला ट्रेलर, तर 15 दिवसांनी पिक्चर दाखवेन : थेट शिंदे-फडणविसांना इशारा

Bachchu Kadu : आता रवी राणा यांच्यासोबत आरपारची लढाई असल्याचे कडूंनी सांगितले आहे.
 Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

अमरावती : भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील मागील काही दिवसांपासून सुरू असलेला घमासान संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत. कडू यांनी आता राणांना थेट आव्हानच दिले आहे. आता रवी राणा यांच्यासोबत आरपारची लढाई असल्याचे कडूंनी सांगितले आहे. 1 नोव्हेंबरला तर ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दाखवू, असा इशाराच कडूंनी दिला आहे.

 Bachchu Kadu
Tata Airbus : शशिकांत शिंदे संतप्त; म्हणाले, आता बढाया मारणारे गप्प का...

शिंदे फडणवीसांनी याबाबत समोर यायला पाहिजे, स्पष्टीकरण दिले पाहिजे. हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वच धोक्यात येत असेल तर बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आपण फुसका बार आहे की बॉम्ब आहे, 1 तारखेला दाखवू. फटाके 1 तारखेला वाजणारच, असे आवाहन त्यांनी थेट शिंदे फटणवीसांना दिला.

 Bachchu Kadu
Bachchu Kadu : 'फुसका फटका' की बॅाम्ब ? ; ट्रेलर 1 तारखेला, 15 दिवस पिक्चर बघा !

दरम्यान, "दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे," असे टि्वट रवी राणा यांनी केले आहे. त्याला बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "एक तारखेला ट्रेलर दिसेल. आणि पंधरा दिवसांनी पिक्चरही दाखवू," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in