आजचा वाढदिवस : प्रवीण कुंटे पाटील (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काॅंग्रेस)

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (NCP) ते नेहमीच संघर्ष करीत राहिले. मोठेपणा कधी मिरवला नाही, हेच त्यांचे मोठेपण.
Pravin Kunte Patil
Pravin Kunte PatilSarkarnama

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील हे विद्यार्थी दशेपासूनच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर शरद जोशींच्या संपर्कात आल्यानंतर १० वर्षे त्यांनी शेतकरी आंदोलनाला वाहिली. देशाचे दोन माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग आणि लाल बहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांशी त्यांची जवळीक होती. व्ही.पी. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वातही त्यांनी मोठे काम केले आहे.

विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कुंटे पाटलांनी आंदोलने केली, त्यासाठी तुरुंगवासही भोगला. त्यांची आजवरची एकंदर कारकीर्द चळवळीची राहिली आहे. ते कॉंग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात होते, तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात होते. सत्ताधाऱ्यांना छेद देणारी त्यांची भूमिका होती. ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी इतर सर्व राजकीय पक्षांना झुगारून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. या पक्षातही ते नेहमीच संघर्ष करीत राहिले. मोठेपणा कधी मिरवला नाही, हेच त्यांचे मोठेपण.

सत्तेत असतानाही त्यांनी कधी सत्तेचा दुरुपयोग केला नाही. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, नरखेड आणि वर्धा जिल्ह्यात त्यांची जडणघडण झाली. ओबीसींच्या मंडल कमिशनचे समर्थक असल्याने बरेचदा ते तुरुंगात गेले. शेतकरी आंदोलनामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये त्यांना अटक झाली होती.

Pravin Kunte Patil
...हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख - जयंत पाटील

पक्की वैचारिक बांधीलकी आणि सत्कर्माचा सतत विचार असला की सत्तावर्तुळात राहुनही माणूस निष्कांचन राहतो. याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे प्रवीण कुंटे. प्रवाहाच्या विरुद्ध वाहणं, हीच त्यांची यशोगाथा, असा संस्कार झालेली ही व्यक्ती देशाच्या दोन दोन पंतप्रधानांच्या निकटस्थ होती, पण असं असूनही त्यांनी स्वत:ला पावन करुन घेतलं नाही. प्रवीणभाऊंना मोठ्या संधी अनेकदा चालून आल्या. पंतप्रधान आणि रामटेकचे खासदार असलेल्या नरसिंहरावांनी आणि नंतर आणखी एका नागपुरातील बड्या नेत्याने आपापल्या पक्षात पक्ष प्रवेशाचं आवतन प्रवीणभाऊंना दिलं होतं, ते त्यांनी नाकारलं. नाही तर कुंटे पाटील कधीचेच विधानसभेत दिसले असते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com