Nitin Gadkari : आज आम्ही जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनलो आहो !

देशात सुशासन आणि देशाचा विकास केला तर राष्ट्राचे पुनर्निर्माण होईल व राष्ट्रवादाच्या भावनेने भारताच्या सर्वांगीण क्षेत्राची प्रगती व विकास साधणे शक्य होईल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नागपूर : देशाच्या पुनर्निर्माणाबाबत आपण विविध क्षेत्रांत प्रयत्न करीत असताना राष्ट्रवाद आमच्यासाठी सर्वोपरी आहे. राष्ट्राचा सर्वांगीण रुपाने सर्वांगीण विकास करून भारताला जगाची महाशक्ती बनवायचे, ही कल्पना घेऊन आम्ही काम करीत आहोत. राष्ट्रवाद सोबत घेऊन देशाला समृद्ध व संपन्न करायचे असेल तर सुशासन आणि विकास आवश्यक आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

देशात सुशासन आणि देशाचा विकास केला तर राष्ट्राचे पुनर्निर्माण होईल व राष्ट्रवादाच्या भावनेने भारताच्या (India) सर्वांगीण क्षेत्राची प्रगती व विकास साधणे शक्य होईल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. भारत रक्षा मंचतर्फे नागपुरातील (Nagpur) रेशीमबाग येथे आयोजित तिसरे अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. आतापर्यंत जगात जे-जे चिंतन झाले ते आपल्या भूमीत पराजित झाले आहे. पण पं. दीनदयालजींनी आम्हाला जे सामाजिक आणि आर्थिक चिंतन दिले, ते आमचे मिशन आहे, आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले, आम्ही एका स्वस्थ समाजाचे घटक आहोत.

आम्ही विस्तारवादी आणि आक्रमणकारी नाही. आम्हाला कुणाची जमीन हडपायची नाही. आमची जी संस्कृती आहे ती सबका साथ सबका विकास, वसुधैव कुटुंबकम ही आहे. हेच आम्ही स्वीकारले आहे. विश्वाच्या कल्याणाची आमची भावना आहे. त्यावर आमचा इतिहास आणि संस्कृती चालत आहे. मूल्याधिष्ठित जीवनपद्धती आणि परिवार पद्धतीवर आमचा समाज उभा झाला आहे. अर्थव्यवस्थेचा विचार केला तर ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर हे आमचे भविष्य आहे. देश आणि मातृभूमीचे रक्षण आम्ही कसे करू, हा भाव जागृत करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आहे, असेही ते म्हणाले.

आधी लोक आम्हाला दुर्लक्षित करीत होते. पण आज आम्ही जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनलो आहे. आत्मनिर्भर भारताकडे आम्ही गतीने पुढे जात आहोत. आमची, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, मागास क्षेत्राचा विकास करून आम्ही विश्वरूप कसे बनू असे राष्ट्रवादी चिंतन आमच्या मनात आहे. पण आमच्या चिंतनाचा जगावर काय परिणाम होईल, ते चिंतन परिणामकारक होण्यासाठी आम्हाला जगाला समजेल या पद्धतीने सादर करावे लागेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आमचे आयुर्वेद, योगविज्ञानाचा प्रचार जगभर झाला. आमचे योगगुरु, शंकराचार्य, संतांनी हे सर्व जगात पोहोचवले. लोक बदलले, देश बदलले, विज्ञान बदलले पण आमची नीती, आदर्श मात्र बदलले नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे नवीन पिढीसमोर कसे सादर करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल. मानवता, राष्ट्रवादाच्या आधारावर आमची संस्कृती, इतिहासाच्या आधारावर राष्ट्राला मजबूत करावे लागणार आहे. आमचा विचार योग्य आहे. पण तो जगासमोर कसा ठेवावा, जगाने तो स्वीकारावा यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.

Nitin Gadkari
Gadkari : गडकरी म्हणाले; सरकारवर फार अवलंबून राहू नका, अन् कारणही सांगितले...

एका बाजूला समृद्ध, शक्तिशाली, सुरक्षित समाज निर्मिती करण्यामुळेच प्रगतिशील, समृद्ध, संपन्न व शक्तिशाली राष्ट्राची निर्मिती होईल. दुसऱ्या बाजूला विचाराच्या आधारावर सहिष्णुता, सहजता, सर्वसमावेशकता व सर्वधर्मसमभाव या आधारावर जातीयता, अस्पृश्यता, सांप्रदायिकता मुक्त समाज निर्मिती व्हावी, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कोणताही मनुष्य हा जाती धर्माने नव्हे तर आपल्यातील गुणांनी मोठा असतो, यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय समाजाची निर्मिती करायची आहे. ही निर्मिती करताना देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाही महत्त्वाची आहे, यावर आज मंचातर्फे गंभीरतापूर्ण चिंतन केले जात आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in