Raj Thackeray: विदर्भातील राज ठाकरेंचा आज शेवटचा दिवस, अंबा एक्सप्रेसने रवाना होणार...

दर तीन ते चार महिन्यांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भात दौरा करणार असल्याचे मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

नागपूर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे गत रविवारपासून विदर्भात आहेत. मुंबई ते नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती असा दौरा करीत आज सायंकाळी अंबा एक्सप्रेसने अमरावती रेल्वे स्थानकावरून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

राज ठाकरेंचा ( Raj Thackeray) विदर्भ (Vidarbha) दौरा खूप चांगला झाला, असे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. या दौऱ्यात त्यांनी १८ आणि १९ सप्टेंबर, असे दोन दिवस पूर्व विदर्भातील नागपूर (Nagpur) शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले. जुन्या कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केला आहेत आणि येत्या घटस्थापनेला नवीन कार्यकारिणीची घोषणा करू, असे राज ठाकरे यांनी १९ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेनंतर ते चंद्रपूरसाठी रवाना झाले होते.

चंद्रपूमध्ये २० सप्टेंबरला त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी चंद्रपुरातून निघून सायंकाळी ते अमरावतीला पोहोचले. तेथे त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. त्यानंतर २१ सप्टेंबरला म्हणजे काल त्यांनी सकाळी गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर तळेगाव येथील क्रीडा ॲकेडमीला भेट दिली. त्यानंतर पश्‍चिम विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज काही संस्था आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत.

Raj Thackeray
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप-शिंदे गट-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

राज ठाकरे यापूर्वी १७ ऑक्टोबर २०१८ ला अमरावतीला आले होते. त्यानंतर यावेळी ते पहिल्यांदाच आले आहेत. तेव्हा त्यांनी अमरावती अंबा फेस्टिवलला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी मेळघाटमधील अति दुर्गम चिचाटी या गावाला भेट दिली होती. त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले होते. आता दर तीन ते चार महिन्यांमध्ये ते विदर्भात दौरा करणार असल्याचे मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in