Tiosa APMC : ...म्हणून यशोमती ठाकूर यांचे राष्ट्रवादीसोबत फिसकटले !

Yashomati Thakur : राष्ट्रवादीला एकाही ठिकाणी जागा न दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Yashomati Thakur, Tiosa APMC
Yashomati Thakur, Tiosa APMCSarkarnama

Amravati District APMC Election : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे) वज्रमूठ आहे आणि सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अनेक बाजार समितीमध्ये हे गणित जुळले नाही. याला तिवसा बाजार समितीसुद्धा अपवाद नाही. राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट भाजप सोबत जागा वाटप करून तीन जागा घेऊन युती केली. (Allocated seats with BJP and formed an alliance with three seats)

एका जागेवर अपमानास्पद वागणूक देऊनही युती केल्याचे स्पष्ट जाणवत आहे. चार पक्ष एकत्र येऊन शेतकरी परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष मिळून १८ पैकी १६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

काँग्रेस पक्षाची म्हणजेच आमदार यशोमती ठाकूर यांची या बाजार समितीवर एकहाती सत्ता आहे. त्यांनी महाविकास आघाडी समर्थीत सहकार पॅनल उभे केले आहे. १८ जागांवर उमेदवार दिले असून यामध्ये काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी युती केली. मात्र महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांचा घरोबा होऊ शकला नाही.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. शरद तसरे यांनी सर्व मतभेद विसरून त्यांच्या प्रचारात उडी घेतली होती. मात्र त्यानंतरच तीन महिन्यातच झालेल्या तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाही ठिकाणी जागा न दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच आता ते थेट यशोमती ठाकूर यांच्या विरोधी गटाकडे गेले आहेत.

Yashomati Thakur, Tiosa APMC
Yashomati Thakur : तेव्हा एकनाथ शिंदेही महाविकास आघाडीमध्ये आमच्या सोबत होते...

ही निवडणूक सहकार क्षेत्रातील असल्यामुळे पक्ष विरहित असते. मात्र दिवसेंदिवस याला पक्षीय स्वरूप आले आहे. आता थेट पक्षाशी संबंध जोडल्या जात आहे यामुळेच पक्षीय पातळीवर या निवडणुका होत असल्याने याचे राजकीय पटलावर मूल्यमापन होत आहे. त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या (APMC Election) माध्यमातून आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मात्र एक पाऊल पुढे टाकत काँग्रेसमधील (Congress) अनेक दुखावलेले मोट बांधली आहे. गावागावांतील गटात विखुरलेल्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या (BJP) माध्यमातून राजेश वानखडे हे नेते तिवसा तालुक्याला मिळाले. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत किती यश मिळते, यापेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी किती साथीदार जोडले जातात, यावर त्यांचे विशेष लक्ष दिसत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com