वाघ, वाघीण अन् आता वाघोबाही गेले, उरले केवळ मावळे…

विदर्भातील मूळ असलेल्या यवतमाळ, (Yavatmal) वाशीम व हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना संपली की विदर्भातून शिवसेना संपली, असा त्याचा अर्थ काढला जात आहे.
MP Hemant Patil, Mp Bhavana Gawali and MLA Sanjay Rathod.
MP Hemant Patil, Mp Bhavana Gawali and MLA Sanjay Rathod.Sarkarnama

यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड शिंदे गटात गेल्यानंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व खासदार हेमंत पाटील हेदेखील शिंदेच्या सेनेत दाखल झाले. यावर जिल्ह्यातील राजकीय जाणकारांनी फारच सूचक मत व्यक्त केले आहे.

त्यांच्या मते, ’वाघानंतर वाघीण अन् आता तर वाघोबाही गेले, उरले केवळ मावळे’. आता मावळ्यांनाही खिंडीत धरण्याचे काम होईल,’ विदर्भातील मूळ असलेल्या यवतमाळ, (Yavatmal) वाशीम (Washim)हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) संपली की विदर्भातून शिवसेना संपली, असा त्याचा अर्थ काढला जात आहे. राज्यात शिवसेनेत बंड झाले आणि गटप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी घरोबा करीत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के देण्याचे काम सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना नेते व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार आमदार संजय राठोड हे शिंदे गटात सुरुवातीलाच सामील झाले, हा शिवसेनेला पहिला मोठा धक्का होता. तर, आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी व हिंगोली-उमरखेडचे खासदार हेमंत पाटील हे दोन्ही खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिंदेच्या सैन्यात दाखल झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रामाणिक मावळ्यांनी खिंड राखण्याचा प्रण केल्याचे दिसते.

कालच्या घडामोडींवर नागरिकांनी तर वाघ, वाघीण अन् आता वाघोबाही गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया इतकी सूचक आहे की, विदर्भात शिवसेनेचा वाघ म्हणजे आमदार संजय राठोड असे समीकरण झाले होते. ते शिवसेनेचे मंत्री म्हणूनही राहिले आहेत. तर खासदार भावना गवळी सतत पाच पंचवार्षिकपासून खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची तर शिवसेनेची वाघीण अशीच पक्षात ओळख होती. त्यानंतर हिंगोली-उमरखेड लोकसभेला खासदार हेमंत पाटील यांच्या रूपाने वाघोबा मिळाले. आज दोन्ही खासदारांनी शिंदे गटांत सहभागी होऊन विदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

MP Hemant Patil, Mp Bhavana Gawali and MLA Sanjay Rathod.
शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनीही थेट `पुरावाच` पाठवला..

हा धक्का लोकांच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात लोकांनी शिवसेनेच्या खासदार गवळी यांना 25 वर्षे व आमदार संजय राठोड यांना 20 वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. अचानक घडत असलेल्या या राजकीय घडामोडींचा जनमनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांची, नागरिकांची आसवे पुसण्याची फुरसत कुणाला दिसत नाही. नेते आपल्या राजकीय भविष्याचा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे लोकांची नेमकी भविष्यातील दिशा काय असेल, ते येणारा काळच सांगणार आहे.

खासदारांच्या कार्यालयांना पोलिस संरक्षण..

खासदार गवळी यांच्या यवतमाळ येथील संपर्क कार्यालयास व खासदार हेमंत पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या गोदावरी अर्बन बँकेला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com