हजारोंनी दिला साश्रुनयनांनी निरोप; डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन...
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

हजारोंनी दिला साश्रुनयनांनी निरोप; डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन...

ज्येष्ठ सुपुत्र माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, (MLA Sudhir Mungantiwar) सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार यांनी मंत्राग्नी दिला.

नागपूर : राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिद्ध डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांना आज येथील शांतिधाम मोक्ष घाटावर मंत्राग्नी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, (MLA Sudhir Mungantiwar) सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार यांनी मंत्राग्नी दिला. त्यावेळी जनसागर लोटला होता.

डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे ३ जून रोजी हृदयविकाराने नागपूर येथील किंग्ज वे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळतात राज्याच्या सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो नागरिकांकडून मुनगंटीवार परिवाराचे सांत्वन करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) खासदार बाळू धानोरकर, (Balu Dhanorkar) माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, (MLC Chandrashekhar Bawankule) आमदार अशोक उइके, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार नरेश पुगलिया, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, प्रा. अनिल सोले, डॉ. उपेंद्र कोठेकर, अरविंद शहापूरकर, माजी नगराध्यक्ष राखी कंचर्लावार, डॉ. सुरेश महाकुलकर, राहुल पुगलिया, रामु तिवारी, विनोद दत्तात्रेय, दीपक जयस्वाल, राजीव कक्कड, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, राहुल पावडे, हरीश शर्मा, अलका आत्राम, नंदू रणदिवे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

MLA Sudhir Mungantiwar
असे दृढ झाले आमदार सुधीर मुनगंटीवार आणि गुरुकुंज मोझरीचे नाते…

अंत्यसंस्कार झाल्यानंतर रा. स्व. संघाचे नगर संघचालक रविंद्र भागवत यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. डॉ. मुनगंटीवार यांच्या निधनाने व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पडद्याआड गेला. त्यांचे संघकार्य प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी होते, असेही रविंद्र भागवत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in