राखेच्या पुरात घर गमावलेल्यांना मिळाली मदत, शेतकऱ्यांनाही लवकरच मिळणार…

कोराडी पाॅवर प्लांटचा बंधारा फुटलाच कसा, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही केली असल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : शहरानजीकच्या (Nagpur) कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने पाच गावांतील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. महाजनकोने आज घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले.

अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत राखयुक्त पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी घरांचे तसेच शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याची सूचना केली होती. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde)उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज १३ गरीब नागरिकांना ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत घराच्या नुकसान भरपाईचा धनादेश महाजनकोकडून मिळाला.

Chandrashekhar Bawankule
अपयश लपविण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप....चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल..

शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून त्यांनाही लवकरच मदत मिळणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळाली. पुढील तीन वर्षे येथील शेतीत पीक होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यांनी घरांचे नुकसान झालेल्यांना मदत दिल्याने त्यांचे आभार मानतो. याशिवाय हा बंधारा फुटलाच कसा, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही केली असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in