Ashish Deshmukh News: कॉंग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नाही…

Congress News: कॉग्रेसचे समर्थन कुणाला, यावरून सगळा घोळात घोळ सुरू आहे.
Ashish Deshmukh, Congress.
Ashish Deshmukh, Congress.Sarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉग्रेसचे समर्थन कुणाला, यावरून सगळा घोळात घोळ सुरू आहे. काल माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सुनील केदार यांनी विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. पण त्या नेत्यांना तो अधिकार नाही, ते त्यांचे वैयक्तिक मत असावे, असे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज सांगितले.

या निवडणुकीत कॉंग्रेसने (Congress) समर्थन कुणाला द्यायचे, यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) घोळात घोळ घालत आहेत. कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी काल वडेट्टीवार यांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. याबाबत विचारले असता डॉ. देशमुख म्हणाले, तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. वैयक्तिकरीत्या त्यांनी अडबालेंना समर्थन दिले असेलही. पण ती कॉंग्रेसची भूमिका नाही.

Ashish Deshmukh, Congress.
Marathwada Teacher Constituency : चौदा उमेदवार रिंगणात, पण खरी लढत काळे-पाटील यांच्यातच..

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. परिणामस्वरूप ॲड. अभिजित वंजारी यांनी मोठा विजय त्याठिकाणी मिळविला होता. त्यावेळी राजेंद्र झाडे यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे वचन दिले होते. ते वचन आपण पाळत आहो आणि त्या वचनाची पूर्ती म्हणून राजेंद्र झाडे यांना आज समर्थन जाहीर केले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे विजयी होऊ शकणारे उमेदवार आहेत, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

Ashish Deshmukh, Congress.
Ashish Deshmukh : राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे प्रदेशाध्यक्षही निवडणुकीतून निवडावा...

मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा याविषयी बोलणार आहे. या दोन्ही नेत्यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावं, अशी मागणी करणार आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावे. महाविकास आघाडीचे समर्थन मिळाल्यास राजेंद्र झाडे हे हमखास निवडून येतील, असा विश्‍वास डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पद सांभाळता येत नाहीये. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावे, या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com