Bharat Jodo Yatra : 'या' सासु-सुनेचे आहे कॉंग्रेससोबत तीन पिढ्यांचे नाते

Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांनी जे ध्येय हाती घेतले आहे ते अतिशय महत्वाचे आहे.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा विदर्भात आहे. अनेकजण उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. यामध्ये ७३ वर्षाच्या वृद्धा आणि ६० वर्षीय सून यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या दोघींचाही

भारत जोडो पदयात्रेत सासुसूनेच्या निरंतर चालण्याचा त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजविणारा आहे. कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत १५ तारखेपासून विदर्भात हिंगोलीमार्गे दाखल झाली. वाशीम, अकोला असा यंत्राचा प्रवास झाल्यावर शेगाव येथे भव्य सभा झाली. त्यानंतर आज सकाळी शेगाव येथील मार्केट यार्ड येथून यात्रेची सुरुवात झाली.

Bharat Jodo Yatra
किल्लारी परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का; जमिनीखालून रेल्वे धावल्याचा भास झाला

यावेळी यात्रेत नाशिक येथील निफाड तालुक्यातील ७३ वर्षीय निर्मला खरडे आपल्या सुन संध्या पवार यांच्यासह सहभागी झाल्या. अगदी सुरुवातीपासून निर्मला खरडे या काँग्रेसशी जुळल्या असून त्या सलग दोनदा जिल्हा परिषद सदस्य आणि नाशिक महिला काँग्रेस अध्यक्षही राहिल्या आहेत. त्यांच्या बहिणीची सून सध्या नाशिकच्या एक अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. निर्मला खरडे म्हणतात, काँग्रेसने कधीही कुणाचा द्वेष केला नाही. राहुल गांधी यांनी जे ध्येय हाती घेतले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही यात्रेत सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन पिढ्यांची साक्षीदार

निर्मला खरडे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य लाभले. या यात्रेत म्हणून सहभागी झाले असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in