हे श्रीमंतांचे सरकार आहे; प्रकाश आंबेडकरांची शिंदे-फडणवीसांवर टीका...

सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

अकोला : हे श्रीमंतांचे सरकार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करून श्रीमंतांना दिलासा मिळाला पण, सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendar Fadanvis) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेच्या वेळी या नेत्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्ती त्यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. पेट्रोलवरील दर पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे इंधनाचे दर कमी होऊन महागाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली होती.

शिंदे सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करीत हे श्रीमंतांचे सरकार असून, सर्वसामान्यांच्या जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा त्यातून मिळणार नसल्याचे टीका केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी करण्यात आले होते. त्यावेळी राज्य सरकारकडूनही (State Government) इंधनावरील करात कपात करण्याची मागणी वाढत होती. तत्कालीन ठाकरे सरकारनेही इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केली होती. या कपातीचा परिणाम मात्र इंधन दर कपात होण्यावर दिसून आला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा राज्य सरकारने इंधनावर दर कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा केली जात असली तरी त्याचा फायदा हा सर्वाधिक श्रीमंतांनाच होणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar
video : फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं ; प्रकाश आंबेडकर

काय म्हटले आहे ट्विवटमध्ये?

‘‘हे श्रीमंतांचे सरकार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करून श्रीमंतांना दिलासा मिळाला पण, सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in