Nana Patole Jansanwad Yatra : 'ही' हुकूमशाही नाही तर दुसरं काय ? संसदेच्या उद्घाटनापासून शेतकऱ्यांपर्यंत.. पटोलेंनी सगळचं काढलं

Congress Politics : पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा मानस भाजप बाळगून असेल तर ते आता चालणार नाही.
Nana Patole Jansanwad Yatra :
Nana Patole Jansanwad Yatra :Sarkarnama

Chandrapur Political News : कोणालाही विश्वासात न घेता, न कळवता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता हे अधिवेशन सुरू झाल्यानंतरच नक्की काय प्रकरण आहे, हे आपल्याला कळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रे दरम्यान माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पदाची गरिमाही संपवण्याचा प्रयत्न केला. नवीन संसदेच्या उद्घाटनावेळी हे दिसलं, संसदेचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रपतींना होता. पण त्यांना बाजूला सारून पंतप्रधांनानी स्वत: उद्घाटन केलं. ही हुकूमशाही नाही तर काय आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. इतकेच नव्हे तर, आम्ही जी लढाई लढतोय ती स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. हा जनसंवाद त्यासाठी आहे. मोदी सरकारने लोकशाही संपवायला सुरूवात केली आहे. त्यासाठी आमचा हा लढा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Nana Patole Jansanwad Yatra :
India Name Controversy: मोदी सरकारने 'इंडिया'चे नाव बदलले..; काँग्रेस नेत्याने थेट कागदच दाखवला

त्यामुळे भाजपा आता सत्तेबाहेर जाणारच. लोकांचा जो मानस आहे, तो ठरलेला असून काँग्रेसच बरी होती. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार काँग्रेसनेच जोपासले. काँग्रेस पक्षच आम्हाला न्याय देऊ शकतो, अशी भूमिका आता नागरिकांकडून मांडली जात आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन हे ठरलेलं आहे. ज्या पद्धतीने खोटं बोलून भाजपवाले सत्तेत आले, ते लोकांना कळले असून नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.

भाजपवाले कितीही जॅकेट घालून फिरले आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कितीही पैसे कमावले, पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा मानस भाजप बाळगून असेल तर ते आता चालणार नाही. नागरिकांना आता काँग्रेसच्या रूपाचं सरकार केंद्रात आणि राज्यात पाहिजे, असे चित्र जनसंवाद यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या गडचिरोलीत दाखल जनसंवाद पदयात्रेदरम्यान दिली.

Nana Patole Jansanwad Yatra :
Girish Mahajan News : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन यांच्या सूचना!

यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा, भंडारा, प्रत्येक ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा कळलं प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये निधी देऊन दुसरीकडे शेतकऱ्यांनाच लुटले जात आहे. शेतीच्या अवजारांवर १८ टक्के जीएसटी आणि इम्पोर्टेड गाडीवर १० टक्के जीएसटी लावली. म्हणजे एक लाख लुटायचे आणि सहा हजार द्यायचे ही बनिया वृत्ती आहे. शेतकऱ्यांच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in