हा केवळ भास आहे, यापूर्वी शिवसेना अशा अनेक संकटांतून बाहेर पडलेली आहे...

संघटना बांधण्याकडे आता आमचा कल आहे आणि आज जेवढे आमदार आहेत, तेवढेच आमदार लोकसभेच्या पुढील निवडणुकीत आमचे राहणार आहे, असे खासदार राऊत (Mp Sanjay Raut) म्हणाले.
Sanjay Raut, Shivsena
Sanjay Raut, ShivsenaSarkarnama

नागपूर : कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी आता उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो आहे. पक्षाच्या संघटनेचे काम आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. बंड विसरून जा. काहीही फरक पडलेला नाहीये. सगळं काही जागच्या जागी आहे. सध्या जे दाखवलं जातंय, तो भास आहे. हे सर्व तात्पुरतं आहे. गेल्या ५६ वर्षांत शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडलेली आहे. या काळात अनेक संकटं, वादळं सेनेनं पाहिलेली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

मागच्या नागपूर (Nagpur) दौऱ्यात मी सांगितले होते की, शिवसेना (Shivsena) विदर्भात (Vidarbha) मोठ्या प्रमाणात काम करत आहे. हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला दोन दिवसांसाठी नागपुरात पाठवलं आहे ते लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी. त्यामुळे कोण आलं, कोण गेलं, यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. संघटना बांधण्याकडे आता आमचा कल आहे आणि आज जेवढे आमदार आहेत, तेवढेच आमदार लोकसभेच्या पुढील निवडणुकीत आमचे राहणार आहे, असे खासदार राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

हे सरकार बेकायदेशीर आहे...

मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत आहे. अशा वेळी राजभवनातून त्यांना शपथ देणे बेकायदेशीर आहे. १९ जुलैला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जर कुणी मंत्री म्हणून शपथ घेत असतील, तर ते घटनाबाह्य आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Shivsena
संजय राऊत यांच्या कार्यक्रमाला दोन्ही उपनेत्यांची दांडी?

शिवसैनिक हा कुणाचा वैयक्तिक कार्यकर्ता नाही...

आज उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो. झालेल्या प्रकारानंतर नागपूर आणि नागपूरच्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. आज नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी आले होते. यावेळी खासदार कृपाल तुमाने आणि त्यांचे कार्यकर्ते नव्हते. याबद्दल विचारले असता, मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविषयी बोललो. शिवसेनेचा कार्यकर्ता हा कुणाचा वैयक्तिक कार्यकर्ता नाही, असे ते म्हणाले.

मागील सरकारने घेतलेले निर्णय महाराष्ट्राचं, जनतेचं आणि लोकशाहीचं हित बघून घेण्यात आले होते. पण आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून फक्त दोघांचं कॅबिनेट काम करत असेल, तर आमचे त्याकडे लक्ष आहे. भविष्यात सत्तांतर, परिवर्तन होईल. विरोधासाठी विरोध म्हणून कोणत्याही सरकारने काम करू नये. मुळात महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात आलेले नाही. आज कॅबिनेटची बैठक केवळ दोघांमध्ये झाली, असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com