Nana Patole : ही भाजपची खेळी; स्वतःचे घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल…

Congress : निवडणुकीआधीच काँग्रेसचा पराभव झाल्याने नामुष्की ओढवली आहे.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी नामांकन अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. पण ऐन वेळी त्यांनी अर्ज भरला नाही आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

पिता-पुत्राने आमच्यासोबत दगाफटका केला. ही भाजपची खेळी आहे. आज त्यांना आनंद होत असेल, पण त्यांचे स्वतःचे घर फुटेल, तेव्हा त्यांना कळेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नागपुरात म्हणाले. नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र व युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

निवडणुकीआधीच काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्याने नामुष्की ओढवली आहे. याविषयी बोलताना पटोले यांनी भाजपावरच टीका केली. नाशिक झालेल्या प्रकाराची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्याचा आज निर्णय होईल, असे सांगतानाच सत्यजित तांबेला काँग्रेसचे समर्थन नाही, हे पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.

काल दुपारपर्यंत बाळासाहेब थोरात माझ्या संपर्कात होते. या घटनाक्रमानंतर तेसुद्धा संपर्कात नाहीत. तांबे यांनी दगाफटका केला. बंडखोरांना काँग्रेस समर्थन देणार नाही. नागपूरच्या उमेदवारीचा तिढा दोन दिवसांत सुटेल, असे पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या मुख्य परीक्षा यापुढील काळात वस्तुनिष्ठ स्वरूपात न घेता यावर्षीपासून वर्णणात्मक स्वरूपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nana Patole
Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघ; तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस आता काय कारवाई करणार ?

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्यात सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य करीत नसतील तर त्यांना सभागृहात घेरण्याची व्युहनीती तयार केली आहे, असे पटोले यांनी सांगितले. सरकार गरीब विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यापासून रोखत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in