या सरकारमध्ये आता टोमणे, टिका करणारी आणि सूड घेणारी मंत्रालये आहेत...

केवळ राजकारण करण्यात यांचा वेळ गेला. त्यामुळे आज ओबीसींना आपल्या हक्कांपासून मुकावे लागल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केला.
या सरकारमध्ये आता टोमणे, टिका करणारी आणि सूड घेणारी मंत्रालये आहेत...
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची (OBC Reservation) हत्या कुणी केली असेल, तर ती या महाविकास आघाडी सरकारने केली आहे. आमच्या काळात मंत्रालयांतून विकासाची कामे केली जात होती. पण आता अशी मंत्रालये राहिलेलीच नाहीत, तर आता टोमणे मंत्रालय, टिका मंत्रालय, अशी खाती राहिलेली आहेत, अशी बोचरी टीका राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) आदेश देशातील सर्व राज्यांसाठी सारखाच होता. मध्यप्रदेश सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यात यश आले. इकडे मात्र महाराष्ट्राचे सरकार अपयशी ठरले. कारण या सरकारचे कामात लक्षच नाहीये. तर केवळ याला टोमणे मार, त्याच्यावर टिका कर, महिलांना जेल यात्रा घडवून आणि विरोधकांचा सूड घ्या, येवढीचे कामे हे सरकार करत आहे. यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विकासाची कुठलीही नवीन कामे झाली नाही. आम्ही मार्गी लावलेल्या अनेक कामांनाही यांनी ब्रेक लावला. केवळ राजकारण करण्यात यांचा वेळ गेला. त्यामुळे आज ओबीसींना आपल्या हक्कांपासून मुकावे लागल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला.

ओबीसी आरक्षणाचे मारेकरी या सरकारमध्ये जे आहेत, ते नेते बेईनामानीने सत्तेत आलेले आहेत. हे ओबीसी नेतेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत. अहंकार, सत्तेचा माज, मस्ती ही सरकारच्या प्रत्येक शब्दामधून व्यक्त होते. आज या सरकारचे प्रशासन पूर्णपणे हतबल झालेले आहे. मंत्री मस्त आहेत, तर जनता त्रस्त आहे अन् प्रशासन सुस्त आहे. मंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी जी खाती पूर्ण क्षमतेने, शक्तीनिशी चालवायची होती, ती तशी चालवली जात नाहीये, असाही आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला.

MLA Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

आता या सरकारमध्ये टोमणे मंत्रालय, केंद्र सरकारवर टिका मंत्रालय, महिलांना जेल यात्रा करवणारे मंत्रालय आणि विरोधकांचा सूड घेणारे मंत्रालय, येवढी चार मंत्रालयच सुरू आहेत, बाकीची सर्व बंद आहेत, असा टोला आमदार मुनगंटीवार यांनी हाणला. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाते, पण ती महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रगतीसाठी नाही, तर केवळ राजकारण करण्यासाठी. गरिबी, बेरोजगारी, आतंकवाद हटवण्यासाठी काही केले जात नाही. तेलंगणाच्या, तामिळनाडू, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांशी आमचे मुख्यमंत्री चर्चा करतात, ती राज्याच्या विकासासाठी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी ती चर्चा असते, ही दुःखाची बाब आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in