Nana Patole News: मौजमस्तीसाठी आणि राज्याची तिजोरी लुटण्यासाठीच हे सरकार आहे...

Congress Meeting : एक मंत्री दर महिन्याला ६ जिल्ह्यात जाणे शक्यच नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Congress News : महाराष्ट्रातील सत्तावादाचे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे न राहता ते सर्वोच्च न्यायालयात सात बेंचच्या समोर गेले पाहिजे, ही उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यामध्ये निवडणूक आयोग हस्तक्षेप करीत आहे, हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

कॉंग्रेसच्या (Congress) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपुरात (Nagpur) सुरू झाली आहे. बैठकीला जाण्यापूर्वी नाना पटोले (Nana Patole) पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील ईडी सरकार (एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस) (Devendra Fadanvis) ही राज्याची तिजोरी लुटण्यासाठी आणि त्यांच्या मौज मस्तीसाठी बनलेली आहे. मंत्रिमंडळातला एक मंत्री सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे. असा टोला देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता नानांनी लगावला. ते म्हणाले, हे संभव होऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी दर महिन्याला जिल्ह्यात जाऊन बैठक घेतली पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्या सोडवल्या पाहिजेत. पण असे होताना दिसत नाही. एक मंत्री दर महिन्याला ६ जिल्ह्यात जाणे शक्यच नाही. तरीही त्यांनी सहा-सहा जिल्हे आपल्याकडे ठेवले, हे न समजण्यासारखे आहे. जनतेमध्ये राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.

जर सरकारमध्ये सहभागी असलेले काही लोक अपात्र ठरले, तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने आपली कार्यवाही थांबवली पाहिजे. राज्य सरकार लोकशाहीच्या परंपरेला हरताळ फासत आहे. या सरकारमधील पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यांवर अन्याय करीत आहे. जनतेचे खूप प्रश्‍न आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे बरेच प्रश्‍न आहे. पण सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही. या सरकारमधील लोक पूर्ण वेळ राजकारण करण्यात लागलेले आहेत. त्यामुळे राज्याची अधोगती होत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

ज्या समृद्धी महामार्गाच्या कामाचा बडेजाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्या रस्त्यावर १००पेक्षा जास्त अपघात झाले. अनेकांनी त्यामध्ये जीव गमावला. खरं तर हा श्रीमंतांसाठी बनलेला रस्ता आहे. गरीब आणि मध्यमवर्गायांसाठी हा रस्ता नाही. जे अपघात झाले, त्यामध्ये लहान गाड्यांचा समावेश आहे. या रस्त्यासाठी घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज आता गरिबांच्या खिशातून लुटून फेडण्याचा घाट घातला गेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in