BJP : तरूणीची छेड काढणाऱ्या ‘या’ भाजप नेत्याला नातेवाइकांनी दिला चोप...

मात्र तो आला नाही. दरम्यान आज सकाळच्या सुमारास आपल्या कारने गोंडपिपरीच्या तहसील कार्यालय परिसरात नेता आला असताना संतापलेल्या नातेवाइकांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांसमोरच नेत्याची धुलाई केली.
Chandrapur, BJP
Chandrapur, BJPSarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : एसटीच्या (ST) प्रवासात भाजपच्या नेत्याने एका तरूणीची छेड काढली. तरुणीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. दरम्यान त्याला समज देण्यासाठी कुटुंबीयांनी नेत्याला पाचारण केले, मात्र तो आला नाही. दरम्यान आज सकाळच्या सुमारास आपल्या कारने गोंडपिपरीच्या तहसील कार्यालय परिसरात नेता आला असताना संतापलेल्या नातेवाइकांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांसमोरच नेत्याची धुलाई केली.

मुलीच्या वयाच्या तरूणीची छेड काढणा-या नेत्यास कुटुंबीयांनी चांगलाच धडा शिकविला. आज चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिपरीच्या तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला. तेव्हापासून कोण हा नेता, याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. गोंडपिपरी येथील एक तरुणी चंद्रपूरला बसने जात होती. याचदरम्यान भाजपच्या तालुका प्रवर्गाच्या सेलचे अध्यक्ष तथा हिवरा गावाचे सरपंच निलेश पूलगमकर हे तिच्या सीटवर बसले. प्रवासादरम्यान पूलगमकर यांनी तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला.

दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पूलगमकर यांना बोलाविले. मात्र ते आले नाही. अशात आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास निलेश पुलगमकर हे आपल्या कारने गोंडपिपरीच्या तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी संतापलेल्या नातलगांनी निलेश पूलगमकर याची चांगलीच धुलाई केली. एवढेच नाही तर तहसील कार्यालयासमोरील चहा सेंटर जवळ नेऊन त्याला पुन्हा चोप दिला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पण विषयाचे गांभीर्य बघता त्यांनी बघ्याची भूमिका घेणे पसंत केले. गोंडपिपरीत आज घडलेल्या प्रकाराची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली. या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

Chandrapur, BJP
'' खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर उद्धव ठाकरेंना ...'' ; भाजप नेत्याचा टोला

नेता म्हणतो, माझ्याच पक्षातील लोकांचा हात..

या घटनेसंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष व हिवऱ्याचे सरपंच निलेश पुलगमकर यांच्याशी संपर्क साधला असता, तरुणीला व तिच्या कुटुंबीयांचा गैरसमज झाला. तरुणी मोबाईलवर फ्लिपकार्टच्या माध्यमातून वस्तू बोलविण्याची प्रक्रिया करीत होती. मी तिच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केवळ गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. मला फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माझ्यात पक्षातील काही लोकांचा यामध्ये मोठा हात आहे, असे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com