खासदार बाळू धानोरकरांचा बंगला चोरट्यांना फोडला; तिघांना अटक…
Mp Balu Dhanorkar's bungalow, Chandrapur Latest Marathi News Sarkarnama

खासदार बाळू धानोरकरांचा बंगला चोरट्यांना फोडला; तिघांना अटक…

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांना सरकार नगर येथे 'सुर्यकिरण' नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता कार्यालय दुसरीकडे हलवले.

चंद्रपूर : गत काही दिवसांपासून चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. आता तर चोरट्यांनी चक्क चंद्रपुरातील खासदारांचा बंगलाच फोडला. सुदैवाने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र त्यांनी घरातील कपाट फोडले, सामानांची नासधूस केली. यावेळी केवळ चौकीदार आणि त्याची पत्नीच बंगल्यात होते. ही घटना काल रात्री घडली. (Chandrapur Latest Marathi News)

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांना सरकार नगर येथे 'सुर्यकिरण' नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता कार्यालय दुसरीकडे हलवले. मात्र निवासासाठी खासदार धानोरकर या बंगल्याचा वापर करतात. काल मंगळवारी ते मुक्कामी नव्हते. रात्री वरोऱ्याला निघून गेले. हीच संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगाल्याच्या सुरक्षाभिंतीवरुन उडी मारून आत प्रवेश केला. त्यावेळी चौकीदार आणि त्यांची पत्नी बंगल्यालगतच्या खोलीमध्ये गाढ झोपेत होते. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.

बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. या घटनेची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिस यंत्रणा हादरली. मोठा फौज फाटा खासदारांच्या बंगल्यावर पोहोचला. बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तीन युवक कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली.

Mp Balu Dhanorkar's bungalow, Chandrapur Latest Marathi News
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

बारा तासांच्या आता तिघांनाही जेरबंद केले. रोहित इमलकर (वय २४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (वय २०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. खासदारांच्या बंगल्यातून खाली हात परत यावे लागल्याने या तिघांनी या परिसरातील आणखी दोन घरं फोडली. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होते. त्यांना खासदार येतात कधी, मुक्कामी कधी असतात, याची खडानखडा माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट केले. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. जिल्ह्यात खून, चोरीच्या घटना वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बंगला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यामुळे सरकार नगर परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.