‘ते’ गोंधळ निर्माण करण्याच पूर्ण प्रयत्न करतील, पण संयमी नेतृत्वात आम्ही सावध आहोत !

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन तमाम शिवसैनिकांना एक संदेश दिला. ठाकरे म्हणाले, ‘आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. मेळाव्यासाठी गुलाल उधळत या, पण शिस्तीत या.
Satish Harde and Uddhav Thackeray, Shivsena.
Satish Harde and Uddhav Thackeray, Shivsena.Sarkarnama

नागपूर : हो, नाही म्हणता म्हणता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. उच्च न्यायालयाने तसा निकाल काल दिला. या निकालानंतर शिवसैनिकांनी राज्यभर एकच जल्लोष केला. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी गुलाल उधळत, फटाके फोडून हा आनंद साजरा केला.

दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन तमाम शिवसैनिकांना एक संदेश दिला. ठाकरे म्हणाले, ‘आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. मेळाव्यासाठी गुलाल उधळत या, पण शिस्तीत या. कोरोना काळ सोडला तर एकही दसरा मेळावा चुकवलेला नाही. असाच विजय आपण पुढेही मिळवू.’ यामधील त्यांचे ‘गुलाल उधळत या, पण शिस्तीत या’, या वाक्य खूप महत्वाचे आहे. या वाक्यात मोठा अर्थ दडलेला आहे, असे शिवसेनेचे (Shivsena) नागपूरचे (Nagpur) माजी जिल्हाप्रमुख व गोंदिया जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख सतीश हरडे ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

‘ते’ गोंधळ घालणार, हे स्पष्ट दिसते आहे. शासकीय यंत्रणांनी आता सावध असलं पाहिजे. ‘कोंबडी चोरा’ची पिल्लावळ हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयबी सक्रीय असली पाहिजे. तसेच राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंत्रणा कामाला लावली पहिजे. कारण दसरा मेळाव्यात काही गोंधळ झाल्यास त्याची तक्रार सर्वात आधी पोलिस करतील. आणि ती तक्रार कशी असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आमच्या दसरा मेळाव्यात गोंधळ होऊच नये, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आयबीची आहे. ‘कोंबडी चोरा’च्या पिल्लावळासोबतच मुंबईतील ‘शेला’सुद्धा गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तर संयमानेच सर्व परिस्थिती हाताळणार आहोत. पण राज्य सरकारनेही आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली पाहिजे, असेही सतीश हरडे म्हणाले.

यासंदर्भात सतीश हरडे म्हणाले, उच्च न्यायालयाने काल दिलेला निकाल नैसर्गिक आहे. कारण शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून (Balasaheb Thackeray) ही परंपरा सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गद्दारी केल्यानंतर जी काही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामध्येही शिवसेनेने सर्वात आधी शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क मेळाव्यासाठी मिळावे, या मागणी अर्ज दिला होता. त्यामुळे राज्यभरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत झाले. उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाच्या विरोधात शिंदे सेना आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. पण तेथेही त्यांना यश मिळणार नाही. कारण एकनाथ शिंदे आणि भाजपवर लोकांचा विश्‍वास राहिलेला नाही.

Satish Harde and Uddhav Thackeray, Shivsena.
उद्धव ठाकरे देणार संजय राठोडांना चेकमेट; बंजारा समाजाच्या नेत्यांशी मुंबईत खलबतं

भाजप - शिंदे गटाने जनसामान्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यामुळे जनतेचा विश्‍वास आता उद्धव ठाकरे यांच्यावर अधिक वाढला आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे दिसणार आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून तमाम निष्ठावान शिवसैनिक मुंबईला जाणार आहेत. शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे रवाना होतील. या जथ्थ्यांमध्ये काही असामाजिक तत्त्वांना घुसवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही आत्तापासूनच सावध झालो आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहेत आणि शिवसैनिक जेवढा आक्रमक आहे, तेवढा संयमीसुद्धा आहे. येणाऱ्या दसरा मेळाव्यात आमच्या संयमाचा परिचय आम्ही देणार आहोत, असे सतीश हरडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com