पूर्वी पहाटे पडायची, आता त्यांना दिवसाही स्वप्नं पडू लागलीत…

परवा परवाच ‘मला आताही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते’, असे वक्तव्य फडणवीसांनी Devendra Fadanvis केले होते. त्याचा आज नानांनी Nana Patole चांगलाच समाचार घेतला.
पूर्वी पहाटे पडायची, आता त्यांना दिवसाही स्वप्नं पडू लागलीत…
Nana Patole and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल फार काही बोललेच पाहिजे, असेही काही नाही. पूर्वी त्यांना पहाटे स्वप्न पडायची. त्यानंतर त्यांनी सक्काळी सक्काळी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही करून बघितला, त्यांना ते काही जमले नाही. पण आता त्यांना दिवसाही स्वप्न पडत आहेत, हे काही बरोबर नाही, असा मिश्‍किल टोमणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना आज हाणला.

परवा परवाच ‘मला आताही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते’, असे वक्तव्य फडणवीसांनी केले होते. त्याचा आज नानांनी चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांचे समाधान किंवा असमाधान हा आजचा विषय नाही. आज शेतकरी ज्या अडचणीत आलेला आहे. राज्य सरकारजवळ आजच्या स्थितीत जे काही आर्थिक स्रोत आहेत, त्या आधारावर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जावी, याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई १५ हजार कोटी रुपये आहे आणि ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे केंद्राच्या अधिकारात ती मदत झाली पाहिजे. पण केंद्र सरकारचा महाराष्ट्रासोबत दुजाभाव आतापर्यंत जनतेने पाहिला, तो या अडचणीतसुद्धा दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते राज्य सरकारने केलेल्या कामांवर आक्षेप घेत आहेत. कारण येवढाच जॉब त्यांच्याकडे उरला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जो निधी केंद्र सरकारने देणे अपेक्षित आहे, त्यामध्ये राज्यातील भाजपच्या नेत्यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. त्यांनी मदत मिळवून दिली, तर त्यांचे कौतुकच केले जाईल. राज्य सरकारने दिलेला निधी तोकडा आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. राज्य सरकारचे आर्थिक स्रोत वाढल्यानंतर आम्ही सरकारला पुन्हा विनंती करणार आहोत की, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जे झाले आहे, त्यामध्ये आणखी मदत त्यांना मिळाली पाहिजे, ही कॉंग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole and Devendra Fadanvis
पटोले म्हणाले, ‘दादा’पेक्षा ‘नाना’ मोठा...;पाहा व्हिडिओ

ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना कमी निधी मिळत असल्यामुळे राज्याचे ओबीसी मंत्री आणि ओबीसी नेते नाराज का आहेत, याबद्दल आता मुंबईत जाऊन थेट त्यांच्याशीच बोलणार आहे. या समाजांना पुरेसा निधी मिळावा, यासाठी प्रसंगी राज्य सरकारवर दबाव आणावा लागला तरी आणू, पण भटके, विमुक्त आणि ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी कॉंग्रेस घेईल. या दोन्ही समाजाच्या जनतेसोबत कुणीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर ते खपवून घेणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.