त्यांनी घेतला असा निर्णय अन् गावकऱ्यांना बसला सुखद धक्का...

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याच्या चेकलिखीतवाडा या गावातील बारावीतून प्रथम आलेल्या विद्यार्थाच्या हस्ते गावातील मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.
Chandrapur
ChandrapurSarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. घरोघरी तिरंगा मोहीम राबवून उत्सव साजरा होतोय. अशा वेळी स्वातंत्र्यदिनी एका लहानशा गावातील पदाधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण गावाला सुखद धक्का दिलाय.

चंद्रपूर (Chandraur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याच्या चेकलिखीतवाडा या गावातील बारावीतून प्रथम आलेल्या विद्यार्थाच्या (Student) हस्ते गावातील मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. या निर्णयाला सर्वांनीच सहमती दिली. काल या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच उपस्थितांनी आनंद साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखीतवाडा हे छोटसं गाव. अन्यायाविरोधात पेटून उठणारं गाव, अशी या गावाची ओळख. अनेकदा त्यांनी आपल्या कृतीतून याचा परिचय दिलेला आहे.

यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. घर घर तिरंगा यासारख्या मोहिमेतून देशप्रेम जागृत केले गेले. अशावेळी चेकलिखीतवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य कोमल फरकडे, प्रभाकर कोहपरे यांनी स्वातंत्रदिनाचा सोहळा प्रेरणादायी करण्याचे नियोजन केले. पण चेकलिखितवाडा येथे यंदा गावातील बारावीतून प्रथम आलेल्या साहील वाढई या विद्यार्थ्याला हा मान देण्याचा निर्णय घेतला गेला. रीतसर मासिक सभेत हा निर्णय बहुमताने मान्य करण्यात आला.

काल गावातील विद्यार्थ्याच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. एका गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते गावातील मुख्य ध्वजारोहण होत असल्याचे बघून गावकऱ्यांनाही आनंदोत्सवाचा सुखद धक्का बसला. ग्रामीण भागातील तरुण स्पर्धा परीक्षेत यश मिळवू लागले आहेत. त्यांच्या यशाचा टक्का वाढतोय. अशावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना, यशवतांना किती सन्मान मिळतो, याची जाणीव पिढीला कळावी. या हेतूने हा निर्णय घेतला व त्याचे गावभर स्वागत झाले. चेकलिखीतवाडा गावात काल घेतलेल्या या परिवर्तनीय उपक्रमाची जिल्हाभर सकारात्मक चर्चा झाली.

Chandrapur
चंद्रपूर जिल्हा बँकेसह गुजरातच्या एबीजी शिपयार्डचीही सीबीआय चौकशी करा...

गावातील नवीन पिढीला स्पर्धा परीक्षेकरिता प्रोत्साहन मिळावे, यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. या दृष्टीने हा छोटासा प्रयत्न होता. गावातील मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा हा एका गुणवंताच्या हस्ते झाला. या संदेशाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. यापुढे २६ जानेवारीला सुध्दा आम्ही ही परंपरा कायम ठेऊ.

कोमल सुनील फरकडे, ग्रा.पं. सदस्य, चेकलिखीतवाडा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com