Shrikant Shinde: ‘ते’ राज्यभर फिरताहेत आणि आम्हाला पदरात घ्या, अशा विनवण्या करताहेत…

खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघात वाशीम येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Mp Shrikant Shinde) आज आले आहेत.
MP Shrikant Shinde
MP Shrikant ShindeSarkarnama

नागपूर : न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. कुणाकडे किती नंबर आहेत, यावरही न्यायालयात काही गोष्टी अवलंबून असतात. येणाऱ्या काळात न्यायालयाचा जो निर्णय होणार आहे, तो आमच्या बाजूने नक्कीच लागेल, असा विश्‍वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार भावना गवळी (Mp Bhavana Gawali) यांनी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघात वाशीम (Washim) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) आज आले असता अकोला (Akola) विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. आपण जर पाहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाचे २० तास काम करतात. लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम ते युद्ध पातळीवर करीत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील निर्णय वेगाने घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना आधीपेक्षा दुप्पट भरपाई हे सरकार देत आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार संबोधले जात आहे, याबद्दल विचारले असता, ५० आमदार आणि १२ खासदार जेव्हा जेव्हा सत्तेतून बाहेर पडतात, तेव्हा ते गद्दार कसे, असा प्रश्‍न त्यांनी केला. आता पुन्हा काही आमदार शिंदे गटात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आज काही लोक महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत आणि आम्हाला पदरात घ्या, अशा विनवण्या करीत फिरत आले, असा जोरदार टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना लगावला.

MP Shrikant Shinde
एकनाथ शिंदे विसरले पण श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंचे पद लक्षात ठेवले...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा कार्यकर्त्यांना वाटले होते की आता आपली काम होतील. मात्र निधी सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांना मिळाला. त्यामुळे आम्ही पुढचे अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारमध्ये राहिलो असतो, तर एकही कार्यकर्ता शिल्लक राहिला नसता आणि शिवसेना संपली असती. त्यामुळेच आम्ही भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले, असे ते म्हणाले. माझ्या वडिलांना रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, असे बोलतात मात्र शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला आणि संघटना वाढविली त्यामुळं शिवसेना मोठी झाली. आजही ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका पंचायत समित्या सर्व शिंदे साहेबांच्या आहेत, असे खासदार शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com