बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे हे बांडगूळ आहेत, मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले!

आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागावे, अशा सुचनादेखील ठाकरेंनी दिल्या असल्याचे संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी सांगितले.
Sandip Deshpande
Sandip DeshpandeSarkarnama

नागपूर : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचले. बाळासाहेबांचे नाव न घेता केवळ बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे हे बांडगूळ आहेत, अशा शब्दांत नाव न घेता देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. अमरावतीच्या (Amravati) विश्रामगृहात सध्या त्यांचा मुक्काम आहे. एका महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेनेने दिले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना संदीप देशपांडे (Sandip Deshpande) म्हणाले, एका महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा, असे ते म्हणतात. मग ते सत्तेत असताना निवडणूक का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे की कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. कारण बाळासाहेब म्हणजे एक विचारधारा आहे आणि विचारधारेवर कुटुंबीयांचा किंवा कुण्या एकाचा हक्क नसतो, तर त्यावर सर्वांचा अधिकार आहे. ही विचारधारा पुढे घेऊन जाणार त्यांचा खरा अनुयायी आहे.

आता त्यांना भिती कशाची आहे, हे कळत नाहीये. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे हे लोक आहेत. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. पण दसरा मेळाव्यामध्ये सांगण्यासाठी बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे आहेत का? हे त्यांनी तपासावे मग मेळाव्यासाठी धावपळ करावी. विचारधारा सोडून सत्ता मिळवायची आणि वल्गना करायच्या, याला काही अर्थ नाही, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

Sandip Deshpande
भाजप-मनसे युतीच्या चर्चा: संदीप देशपांडे म्हणाले, स्पष्टच सांगतो...

विदर्भ दौरा चांगला झाला...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा चांगला झाला. या दौऱ्यातून अमृत निघेल. पुढच्या काळात मनसे ला मोठं यश मिळेल. पुढच्या एका महिन्यात मनसेच्या एक हजार शाखा आम्ही सुरू करू. या दौऱ्यात पूर्व आणि पश्‍चिम विदर्भातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागावे, अशा सुचनादेखील ठाकरेंनी दिल्या असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in