Parinay Fuke : जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासाठी जागा आहे, पण ओबीसींच्या हॉस्टेलसाठी नाही !

बैठकीत भंडारा- (Bhadara) गोंदियाचे विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी खनिज विकास निधीसह ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा मुद्दा उचलून धरला.
MLC Dr. Parinay Fuke with Sudhir Mungantiwar
MLC Dr. Parinay Fuke with Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : गोंदिया (Gondia) जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात रविवारी राज्याचे वनमंत्री व गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत भंडारा- (Bhadara) गोंदियाचे विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी खनिज विकास निधीसह ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा मुद्दा उचलून धरला.

बैठकीला जिल्ह्यातील दोन्ही खासदार सुनील मेंढे व अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, (MLC Dr. Parinay Fuke) आमदार अभिजित वंजारी, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे आमदार सहेसराम कोरेटी, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विकास राचेलवार मंचावर उपस्थित होते.

ओबीसींच्या विद्यार्थ्यासाठी हॉस्टेलचा मुद्दा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला. आमदार डॉ. परिणय फुके पालकमंत्री असताना होस्टेल मंजूर केले होते. पण अद्याप तयार झाले नाही, असे आमदार वंजारी म्हणाले. त्यावर तेव्हा आम्ही निधी उपलब्ध करून दिला होता. जागा शोधून काम करायचे होते. पण नंतरच्या काळात केवळ कागदी घोडे नाचवले गेले. मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत सातत्याने ओबीसी हॉस्टेलचा पाठपुरावा केला व आताही करत आहो. पण त्यामध्ये अद्यापही यश आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांसाठी घर बांधायला जागा आहे. पण ओबीसी हॉस्टेलला जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे, असे आमदार डॉ. फुके म्हणाले.

एसडीओ, तहसीलदारांना ओबीसी हॉस्टेलसाठी तात्काळ जागा शोधायला सांगा. पुढील बैठकीच्या अगोदर हे काम झाले पाहिजे आणि त्यामध्ये सुस्पष्टता असली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले. प्रस्ताव मंजूर करणे शक्य नसल्याचे सांगण्यात प्रशासनाकडून आले. प्रशासनाने टीबी हॉस्पिटलला जागा आधीच दिली होती. तरीही ओबीसींचा विषय आला की कारणे पुढे केली जातात, असे डॉ. फुके यांनी सांगितले. त्यावर ज्या कामासाठी जागा आरक्षित आहे, त्यांच्याकडून लेखी घ्या. दोन-तीन वर्षांत बांधकाम करणार की नाही, असे विचारा. ते करणार नसतील तर तात्काळ हॉस्टेलचे काम हाती घ्या. एसटीमध्ये सीटवर रुमाल टाकून, ती जागा आपली आहे, असा दावा केला जातो. हा त्यातलाच प्रकार आहे. त्यामुळे असे करू नका, असेही पालकमंत्र्यांनी सुनावले.

MLC Dr. Parinay Fuke with Sudhir Mungantiwar
आमदार परिणय फुके संतापले; म्हणाले विद्यार्थ्यांच्या जिवाशी हा काय खेळ चालवलाय ?

३० एप्रिल २०२२ च्या डीपीडीसी मिटींगमध्ये जो ठराव झाला, त्याला मंजुरी दिली पाहिजे. मागल्या वेळी जो अहवाल होता, तीच स्थिती आजही आहे, ती बदलली पाहिजे, असे आमदार डॉ. फुके म्हणाले. आमगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्रावर वर्षभरात एक लाख भाविक येतात. ३३ क वर्ग तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहेत. ३३ करिता जी.आर. कुणी वाचलेला दिसत नाही. एक आमदार दर्शनाला गेला म्हणजे तीन लाख लोक गेले, असे समजावे, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com