कुणीही नाराज होण्याचे कारण नाही; मनसेच्या नेत्यांनी शरण यावे

रजाकार असल्यासारखे पोलिस मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना शोधत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
कुणीही नाराज होण्याचे कारण नाही; मनसेच्या नेत्यांनी शरण यावे
Dilip Walse Patil-Raj Thackeray Latest NewsSarkarnama

नागपूर : आरोपींना शोधणे हे पोलिसांचे कामच आहे. तो कुठल्या राजीकय पक्षाचा आहे हा मुद्दा नसतो. त्यामुळे आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी केले आहे. गृहमंत्री हे अमरातवीच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावरून अमरावतीकडे जाताना माध्यमांशी संवाद साधला.

Dilip Walse Patil-Raj Thackeray Latest News
नागपुरातील दोन आमदार, माजी महापौर यांच्यासह 104 नेते आज शांत झोपणार

रजाकार असल्यासारखे पोलिस मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpandy) यांना शोधत असल्याचा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकारवर केला होता. सध्या हनुमान चालिसा पठणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून अजान केले जात असतील तर त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे 4 मे रोजी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यात एका महिला पोलिसाला धक्का देण्यात आला होता. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Dilip Walse Patil-Raj Thackeray Latest News
दोन लाख पदे भरणार : `फेकाफेकीत भरणेमामांनी तर अव्वल स्थान पटकावले..`

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसैनिकांच्या धरपकडीवर नाराजी व्यक्त केली आहे. यावर वळसे पाटील यांनी आरोपींना शोधणे व पकडणे हे पोलिसांचे काम असल्याचे सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृह विभागाची जबाबदारी आहे. ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करीत आहेत. त्यात गैर काही नाही. त्यामुळे कुणीही नाराज होण्याचे कारण नाही.

नागपुरातील रेल्वे स्थानकासमोर सापडलेल्या स्फोटकांबाबत स्पष्टता नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, उद्यापपर्यंत स्फोटकांबाबत तपासात स्पष्टता आलेली नाही, असे वळसे पाटलांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.