Nana Patole : ‘त्या’ नेत्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, आज दुपारी पक्षाचा निर्णय होईल...

Congress : पक्षपातळीवर याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. आज दुपारी त्यावर निर्णय होणार आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी विमाशिचे सुधाकर अडबाले यांना तर काही नेत्यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना पाठिंबा दिला आहे. यावर पक्षपातळीवर याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. आज दुपारी त्यावर निर्णय होणार आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

मुंबई (Mumbai) येथे नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे सध्या काहीही बोलणे योग्य नाही. आता कोण परस्पर काय बोलतात, याला काही अर्थ नाही. शेवटी पक्ष घेईल तोच निर्णय अंतिम असेल, असे सांगत त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या कालच्या घोषणेकडे नानांनी दुर्लक्ष केले.

नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. त्यावर घाईघाईत काही बोलणे उचित नाही. त्यामुळे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून मगच त्याबाबत घोषणा करू, असे पटोले म्हणाले. कॉंग्रेस किंवा महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांच्या बाबतीत एकवाक्यता नाही. सर्वत्र गोंधळ उडालेला आहे. त्यामुळेच त्यांचा पराभव होतो, असे भाजपकडून बोलले जात आहे. याबाबत विचारले असता, ३० जानेवारीला मतदान आहे आणि २ फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत.

निकालानंतर स्पष्ट होईल की पराभव कुणाचा होणार. भय दाखवणे, दुसऱ्यांची घरे फोडणे, असली कामं भाजपने केली आहे आणि आताही करत आहे. पण ही सामान्य निवडणूक नाही. येथे उच्चशिक्षित शिक्षक आणि पदवीधर मतदान करणार आहेत. त्यामुळे येथे भाजपचे काही जमणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
Satyajeet Tambe यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार, त्यांना पदावरून हटवा !

देशात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायमच आहे. या मुद्द्यांचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे. सुशिक्षित मतदार यावेळी भाजपला सोडणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक आणि पदवीधर असलेले सुशिक्षित बेरोजगारांनी त्यासाठी कंबर कसली आहे. दुसऱ्यांची घरे फोडणे, ही त्यांची परंपरा आहे. ते काय गोष्टी सांगतात, नाशिक पदवीधरसाठी त्यांना स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. तेथेही फोडाफाडी करून त्यांनी गोंधळ करून ठेवलेला आहे. हे मतदारांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे भाजपचा पराभव यावेळी निश्‍चित आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in