
मुंबई : पदावरून हटविणे, हे कुणाच्या हातात नसतं आणि कुणाच्या म्हणण्याने हटत नसतं. काँग्रेस (Congress) पक्षात एक सिस्टिम आहे, त्यानुसार कामकाज चालतं. काँग्रेसच्या सिस्टिमप्रमाणे ते करत असतात. सध्या तरी नाना पटोले (Nana Patole) यांना हटवा, असे कुठेही दिसत नाही, अशी माहिती दिल्लीत गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळातील माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी दिली. (There is no demand to remove Nana Patole : Shivajirao Moghe)
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, अशी काँग्रेसमधील एका गटाची मागणी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. मात्र, त्यासंदर्भात अधिकृतपणे कोणीही बोलत नाही. त्यामुळे पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत वेगवेगळी चर्चा रंगत आहे. त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मोघे बोलत होते.
ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालयच दिल्लीत असल्यामुळे आम्हाला यावंच लागतं. अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे सदस्य आणि देशभरातील राज्याचे प्रमुख यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यासंदर्भात आम्ही दिल्लीत आलो होतो. केंद्राकडून आमच्यावर म्हणजे आदिवासींवर झालेला अन्याय, आमचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही १४ एप्रिलपर्यंत किंवा त्यानंतर खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कार्यक्रम आम्ही घेणार आहेात. आदिवासींचे प्रश्न संसदेत मांडण्याची विनंती करणार आहोत.
सरकारने तब्बल २५ पेक्षा जास्त सरकारी कंपन्या यांनी विकून टाकल्या आहेत. शंभरपेक्षा जास्ते उद्योग खासगी लोकांना हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीतील जागा कमी झालेल्या आहेत. मोदी सरकार आल्यापासून पेसा कायद्याची अंमलबजावणीच होत नाही. ज्या ठिकाणी भाजपचे राज्य सरकार आहे, त्या ठिकाणी हा कायदा संपल्यातच जमा आहे. याशिवाय अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावर आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेात, असेही मोघे यांनी नमूद केले.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आमची भेट झाली आहे. आदिवसींचे प्रश्न आम्ही त्यांनासुद्धा सांगितले आहेत. संघटनेत ५० टक्के ओबीसी समाजाला आरक्षण ठेवण्याचा निर्णय झाला आहे, त्याबद्दल आम्हाला समाधान वाटत असल्याचेही मोघे यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.