...तर मनपाच्या सिमांकनात होणार बदल, निवडणूक लांबणार; डिगडोह येणार शहरात..

महानगर पालिका (Municipal Corporation) निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. परंतु ओबीसी (OBC) आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नसल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.
...तर मनपाच्या सिमांकनात होणार बदल, निवडणूक लांबणार; डिगडोह येणार शहरात..
Nagpur Municipal CorporationSarkarnama

नागपूर : हिंगणा तालुक्यातील डिगडोह ग्रामपंचायत शहर हद्दीत सामील करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याच्‍या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. हा भाग महानगरपालिका (Municipal Corporation) हद्दीत सामील झाल्यास शहराच्या सीमा बदलणार आहे. त्यामुळे आधीच लांबलेली महानगरपालिकेची निवडणूक आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

नागपूर (Nagpur) महानगर पालिकेच्या निवडणुका (Election) फेब्रुवारीत नियोजित आहे. प्रशासनाकडून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. महानगर पालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून एका प्रभागात तीन सदस्य राहणार आहे. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नसल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डिगडोह ग्रामपंचायत शहर हद्दीत सामील करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्य शासनाने दिल्या आहेत.

ग्रामपंचायत, नगरपालिका करायची किंवा महानगर पालिकेत सामील करायची, यावरून स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये मतभेद आहेत. यासाठी ग्रामसभेत नागरिकांचे मत जाणून घेण्याचा निर्णय राजकीय पुढाऱ्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायतची लोकसंख्या ६० हजारच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. ही ग्रामपंचायत महानगर पालिकेत सामील झाल्यास शहर हद्दीच्या सिमांकनात बदल होईल. सध्या नियमानुसार महानगर पालिकेची सदस्य संख्या १५६ निश्चित करण्यात आली आहे. परंतु नियमानुसार लोकसंख्येत ६० हजारांची भर पडणार असल्याने एकने सदस्य संख्या वाढवावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला नव्याने प्रभाग रचना तयार करावी लागेल. नव्याने प्रक्रिया करावी लागणार असल्याने निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Nagpur Municipal Corporation
...तर नागपूर महानगरपालिका पुन्हा भाजपच्याच ताब्यात राहील !

जिल्हा परिषद निवडणूक ढकलली होती पुढे..

२०१७ ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करून सर्वकाही तयार करण्यात आले होते. त्याच काळात राज्य शासनाने पाठशिवणी व वानाडोंगरी ग्रामपंचायतींचा दर्जा उंचावत नगर पालिका व नगर पंचायत घोषित केले होते. त्यामुळे सर्कलची नव्याने रचना करावी लागली होती. शिवाय निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in