चोरट्यांना घरात काहीच मिळाले नाही, म्हणून चोरली कार; पण...

नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्‍वर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कार घेऊन चोरटे पसार झाले. पण काल रात्री पॅट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले.
Nagpur Police
Nagpur PoliceSarkarnama

नागपूर : बाहेरगावी गेलेल्या लोकांची घरे चोरट्यांच्या टारगेटवर असतात. कारण कुणीच नसल्याने आरामात काम फत्ते करून पळता येते. कडाक्याच्या थंडीत चोरटे एका घरात शिरले. सर्व काही अस्ताव्यस्त करूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पण कारची चाबी त्यांना मिळाली आणि त्यांनी कार चोरली.

नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्‍वर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कार घेऊन चोरटे पसार झाले. पण काल रात्री पॅट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. चोरी गेलेल्या कारसह चोरट्यांकडील दुसरी कार आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन नगर येथील सुरेश नारायण राऊत (वय ५२) हे सहकुटुंब केरळ येथे देवदर्शनाकरिता गेले आहेत. त्यांचे पुतणे अशोक भगवान राऊत शहरात दुसऱ्या ठिकाणी राहातात. त्यांना सुरेश नारायण राऊत यांच्या मोहल्ल्यातील मयूर वेदेश्वर झाडे यांनी सुरेश राऊत यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असून अंगणात कारही (ग्रे कलर, एमएच ४९, बीके २७१२) दिसत नसल्याची माहिती दिली.

अशोक राऊत यांनी लागलीच काका सुरेश नारायण राऊत यांना ही माहिती दिली. काकांनी घरी जाऊन पाहण्यास सांगितले. अशोक राऊत यांनी घरी जाऊन पाहिले असता आलमारी फोडलेली असून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावरून अशोक राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय २०) व ललित गणेश रेवतकर (वय २०) या दोघांना अटक केली आहे. तर आदर्श समर्थ व धवल मून हे फरार आहे.

पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खंडार, हवालदार मनोज नेवारे हे पथकासह रात्र गस्तीवर असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून बेसा चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच ४९, एफ १६०५ क्रमांकाची टाटा इंडीगोमधून दोघे जण येताना दिसले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्यांची नावे प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय २०) व ललित गणेश रेवतकर (वय २०) अशी सांगितली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता राऊत यांच्या घरा व्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या चोरीचीही माहिती त्यांनी दिली.

Nagpur Police
माणदेश कॉरिडॉर : गोपीचंद पडळकरांची तोफ नागपूर अधिवेशनात धडाडणार

या दोघांचे मित्र असलेले आदर्श समर्थ व धवल मून यांच्या पल्सर गाडीने सुदर्शन नगरातील राऊत यांच्या घरी चोरी केली. परंतु हाती काहीच लागले नाही. म्हणून कार घेऊन गेल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात येऊन त्यांच्याकडील कार जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच ३१, एफडी ३५७६ क्रमांकाची बुलेट ताब्यात घेतली. चोरून नेलेली ग्रे कलरची स्विफ्ट डिझायर कार अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातग्रस्त आढळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com