मित्राला कॉल केल्यामुळे वाचली तरुणी, अन् बलात्कारी बाप झाला गजाआड...

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील रहिवासी सद्यःस्थितीत औरंगाबाद येथे फार्मसीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेली मुलगी कॉलेजला सुट्ट्य़ा लागल्यामुळे आपल्या राहत्या घरी आली होती.
Yavatmal
YavatmalSarkarnama

यवतमाळ : अंधश्रद्धेचा भूत अजूनही मानगुटीवरून उतरायचं नाव घेत नाहीये. गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्यासाठी उतावीळ झालेल्या बापाचे पितळ घटनास्थळी वेळेवर पोहोचलेल्या पोलिसांमुळे उघडे पडले. जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील मादणी येथे गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न काल रात्रीच्या सुमारास फसला. यात सहभागी मांत्रिकासह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील रहिवासी सद्यःस्थितीत औरंगाबाद (Aurangabad) येथे फार्मसीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेली मुलगी कॉलेजला सुट्ट्य़ा लागल्यामुळे आपल्या राहत्या घरी आली. गुप्तधनासाठी राक्षसी वृत्तीचा बाप आपल्या आठ साथीदारांना सोबत घेऊन पोटच्या मुलीचा बळी देण्याच्या प्रयत्नात होता. गुप्तधन प्राप्तीसाठी मांत्रिकाची क्रिया सुरू असताना सदर मुलीला आपला बळी जात आहे, हे लक्षात येताच यवतमाळ येथील रहिवासी मित्राला भ्रमणध्वनीद्वारे खोदलेल्या खड्ड्याचा फोटो पाठविला. ही माहिती पोलिसांना (Police) मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

बळी देण्यासाठी खड्डा खोदत असताना तेथील लोकांच्या बोलण्यावरून आपला बळी दिला जात आहे, ही बाब तरुणीच्या लक्षात आली. तिने लगेच मित्राला खड्ड्याचा फोटो पाठवला, त्यानेही लगेच ॲक्टीव्ह होत पोलिसांना माहिती दिली. एरवी चालढकल करणारे पोलिसही लगेच ॲक्शन मोडमध्ये आले आणि घटनास्थळी पोहोचून मुलीची सुखरूप सुटका केली. आई सतत आजारी राहत असल्याने नराधम बापानेच वयाच्या १३ व्या वर्षांपासून अत्याचार केल्याचे मुलीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. तो नेहमीच तिला आई-बहिणीसह ठार मारण्याची धमकी देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. मुलीच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yavatmal
पालकमंत्री संदीपान भुमरे औरंगाबादेतून हाकताहेत यवतमाळ जिल्ह्याचा गाडा…

पोलीस पोहोचल्यावर गुप्तधन काढण्याची प्रक्रिया सुरू होती. यात सहभागी वडील आणि मांत्रिकासह नऊ जणांना साहित्यासह घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली. यात वडील राजकुमार जयवंत धकाते, मांत्रिक वाल्मिक रमेश वानखेडे, विजय शेषरावजी बावणे, रमेश कवडूजी गुडेकार, विनोद नारायण चुनारकर, दीपक मनोहरराव श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार, माधुरी विजय ठाकूर, माया प्रकाश संगमनेरकर या संशयित आरोपीचा समावेश आहे. दरम्यान घटनास्थळाला यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. पुढील तपास बाभूळगाव पोलीस करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com