Adhikar Bike Rally : हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो, जोरगेवारांची रॅली विधानभवनावर धडकलीच...

Kishor Jorgewar : ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे.
Kishor Jorgewar
Kishor JorgewarSarkarnama

Maharashtra Assembly Winter Session News : चंद्रपूरकरांना दोनशे युनिट वीज मोफत देण्यात यावी, ही मागणी मी विसरलेलो नाही. कारण ही केवळ मागणी नसून तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी आहे, अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

चंद्रपूरकरांना (Chandrapur) घरगुती वापरातील दोनशे युनिट वीज मोफत देण्यात यावी, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्यात यावी, रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी, या मागण्यांसाठी काल आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर (Assembly Winter Session) अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर अधिकार बाईक रॅली नागपूरच्या (Nagpur) दिशेने रवाना झाली. या रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, पंकज गुप्ता, वंदना हातगावकर, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, रिषभ दुपारे,प्रतीक शिवणकर, सलीम शेख, राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, नानाजी नंदनवार, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, भाग्यश्री हांडे, सायली येरणे, राकेश पिंपळकर, विलास वनकर यांची उपस्थिती होती. सकाळी नऊ वाजता गांधी चौकातून या रॅलीला सुरवात झाली. लक्ष्मीनारायण मंदिर येथे रॅलीचे स्वागत करण्यात आले. पुढे भद्रावती येथे रवी शिंदे यांनी रॅलीचे स्वागत केले.

Kishor Jorgewar
आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूरची दीक्षाभूमी उपेक्षितच राहिली; आता विकास व्हावा !

वरोरा येथे राहुल जानवे आणि नितीन मत्ते यांनी रॅलीचे स्वागत केले. रॅली नागपूर येथे पोहोचली. यशवंत मैदानावर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्याला दोनशे युनिट मोफत द्या या मागणीचे निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in