धमकी पवारांनी नाही, तर राणेंनी दिली; आता त्यांनी सावध राहावे...

नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह आज शहरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या (NCP) संतप्त कार्यकर्त्यांनी राणे (Narayan Rane) आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
धमकी पवारांनी नाही, तर राणेंनी दिली; आता त्यांनी सावध राहावे...
Duneshwar Pethe, NCPSarkarnama

नागपूर : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरून मोठी चूक केली आहे. धमकी पवारांनी नाही तर राणेंनी पवारांनी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी आज दिला.

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह आज नागपूर शहरातील (Nagpur) व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राणे आणि भाजपच्या (BJP) विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राणेंचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना घरची वाट अवघड होईल, असे म्हणत नारायण राणे यांनी धमकी दिली आहे. देशभरात पवारांबद्दल आदराचे स्थान आहे. पण राणेंनी अशी धमकी देऊन आपली लायकी दाखवली आहे. आता त्यांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आहे.

नागपुरात पाय ठेवाल तर खबरदार...

राजकारणातील पितामह शरद पवार यांच्याबद्दल नीच पातळीची भाषा वापरून नारायण राणेंची त्यांची निचता सिद्ध केलेली आहे. पवारांसारख्या व्यक्तींना ‘घर गाठणे अवघड होईल’, असे बोलणे सर्वथा चुकीचे आहे. राणे स्वतः गुंड आहेत, त्यामुळे ते गुंडगिरीचीच भाषा करणार, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही करता येणार नाही. गुंडगिरीची भाषा करणाऱ्या राणेंनी आता यापुढे नागपुरात येऊ नये, आल्यास आम्ही त्यांना चांगला धडा शिकवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आहे.

Duneshwar Pethe, NCP
पुन्हा एक धक्का : भाजपची युती होणार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ?

पवारांनी धमकी दिली नाही..

शरद पवारांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना कुठलीही धमकी दिली नाही, तर पुढील कार्यवाहीसाठी तुम्हाला मुंबईत विधिमंडळात यावेच लागेल, असे म्हटले आहे. यामध्ये धमकीचा सूर कुठेही नाही. तुम्ही या आम्ही तुम्हाला बघतो, असे कुठेही पवारांनी म्हटलेले नाही. पण राणेंनी जे वक्तव्य केलं, ती सरळ सरळ धमकी आहे आणि ही धमकी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आहे. आम्ही अजिबात सहन करणार नाही. आता त्यांनी नागपुरात येऊनच दाखवावे, आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू, असेही दुनेश्‍वर पेठे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काल राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in