MNS News : विदर्भातील कार्यकर्त्यांच्या ‘या’ प्रश्‍नाने मनसे नेत्यांना भंडावून सोडले...

गेल्या तीन दिवसांपासून नेत्यांनी नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका आगामी निवडणुकांविषयी काय आहे, हे कार्यकर्त्यांना सांगितले.
Avinash Jadhav, Sandip Deshpande and Raju Umbarkar
Avinash Jadhav, Sandip Deshpande and Raju UmbarkarSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज नागपुरात आगमन झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गेल्या तीन दिवसांपासून राज ठाकरेंचे विश्‍वासू संदीप देशपांडे, (Sandip Deshpande) अविनाश जाधव आणि राजू उंबरकर (Raju Umbarkar) दौऱ्याच्या तयारीसाठी नागपुरात तळ ठोकून आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून रवी भवन येथे या नेत्यांनी नागपूर, (Nagpur) चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका आगामी निवडणुकांविषयी काय आहे, हे कार्यकर्त्यांना सांगितले. या तिन्ही दिवसांत कार्यकर्त्यांनी नेत्यांना एक प्रश्‍न केला. तो म्हणजे ‘गेल्या १५ वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले?’ वारंवार येणाऱ्या या प्रश्‍नाने नेत्यांना भंडावून सोडले. आता खुद्द राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या या प्रश्‍नाचा सामना करावा लागेल, असं दिसतंय.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील १५ वर्षांत फक्त १५ सभा जरी विदर्भात घेतल्या असत्या तरी पक्षावर ही वेळ आली नसती असे विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेला विदर्भात पुन्हा पुनजिर्वित करण्यासाठी राज ठाकरे आज नागपुरात दाखल झाले. नागपूरच नव्हे तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेटी देणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. महानगरपालिका निवडणूक मनसे ताकदीने लढणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील नेते राजू उंबरकर हे तीन दिवसांपूर्वीच नागपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आनंद एंबडवार हेसुद्धा आले आहेत. नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्याकडून राजकीय परिस्थिती जाणून घेतली.

Avinash Jadhav, Sandip Deshpande and Raju Umbarkar
Raj Thackeray : राज ठाकरे यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, मिशन विदर्भ सुरू…

मुंबईवरून आलेले पदाधिकारी बैठकांमध्ये पंधरा वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले, पक्ष वाढला का नाही, इतकी अधोगती का झाली असे सवाल करीत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते फारच अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे हेच सूचत नाही. उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमतही नाही. जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत टिकून आहेत हीच मोठी पक्षासाठी उपलब्धी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

आजवर मनसेच्या एकाही वरिष्ठ नेत्यांने विदर्भात लक्ष घातले नाही. पाठबळ दिले नाही. निवडणुकीची तयारी करून घेतली नाही आणि कोण जिंकले, पराभूत झाले याची साधी विचारणाही केली नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक हीच शहरे मनसेच्या अजेंड्यावर होती. त्यामुळे विदर्भात कोणीच लक्ष घातले नाही. पंधरा वर्षांत झालेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात जरी मुंबईतून लक्ष घातले असते आणि राज ठाकरे वरचेवर येत राहिले असते तरी पक्ष जिवंत राहिला असता. ही अवस्था झाली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com