पूरग्रस्त देवाळ्याच्या विद्यार्थ्यांनी अडवली खासदार बाळू धानोरकरांची वाट...

खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) आपल्या टिमसोबत देवाळा गावात पोहोचताच, १५ ते २० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना रोखून धरले.
MP Balu Dhanorkar with Students of ZP School.
MP Balu Dhanorkar with Students of ZP School.Sarkarnama

नागपूर : गेल्या महिनाभरापासून पावसाचा कहर सुरू आहे. शेतांचे प्रचंड नुकसान झाले असून घरे आणि शाळांचीही पडझड झाली आहे. कुठे प्रशासनावर, तर कुठे लोकप्रतिनिधींवर लोकांचा रोष आहे. पण चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळ धानोरकर त्यांच्या मतदारसंघातील पोंभूर्णा तालुक्यातील देवाळा बु. या गावी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्याचे कारणही तसेच होते.

खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) आपल्या टिमसोबत देवाळा गावात पोहोचताच, १५ ते २० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना रोखून धरले. यामुळे ते बुचकळ्यात पडले. यांचा आपल्यावर काही रोष तर नाही ना, असा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. पण मुलांनी (Students) वास्तव सांगताच त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. खासदारांचे स्वागत करायचे असल्याने मुलांनी त्यांची वाट अडवली होती. चिमुकल्यांचा प्रेमळ आग्रह खासदार धानोरकर मोडू शकले नाही आणि त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला.

MP Balu Dhanorkar with Students of ZP School.
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांत हाहाकार मजला आहे. शेती, घरे यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसला. अशातच गावात पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी येणार असल्याची माहिती चिमुकल्या मुलांना कळली. ही चिमुकली मुले आता कोणत्या मागणीसाठी आंदोलन तर करीत नाही ना, असा समज काही वेळासाठी त्यांचा झाला. मात्र, या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे केलेले स्वागत आणि आदरातिथ्य बघून खासदार बाळू धानोरकर भारावले.

राजकारणातील मोठा नेता येणार म्हटलं की गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. वाजत गाजत सत्कार करतात. मात्र पोंभूर्णा तालुक्यातील देवाळा बु. येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खासदारांची वाट अडवून धरत स्वागत केले. हा अनोखा प्रकार बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी मतदारसंघामध्ये दौरे करीत आहेत. त्याच अनुषंगाने अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या देवाळा गावाला त्यांनी भेट दिली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना गावातील चिमुकल्यांनी मात्र आधी त्यांची वाट अडवून धरली आणि नंतर सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com