‘त्या’ पोलिस हवालदाराच्या वक्तव्याची चौकशी होणार...

मंगळवारी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास भंडारा (Bhandara) येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या.
Bhandara Sand Mafiya
Bhandara Sand MafiyaSarkarnama

भंडारा : भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांसोबत पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मटण पार्टीची पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. पार्टीत सामील झालेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता ‘त्या’ पोलिस हवालदाराच्या वक्तव्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जाधव यांनी दिली आहे.

मंगळवारी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास भंडारा (Bhandara) येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू माफियांनी (Sand Mafiya) मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. एकाच वेळी २० ते २५ वाळू माफियांनी हा हल्ला केला होता. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पवनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. त्यांच्या या तक्रारीनंतर आरोपींच्या शोधासाठी काही पोलीस रवानाही झाले होते. मात्र आरोपींना पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या पार्टीचे व्हिडिओ स्थानिक आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिले होते. कर्तव्यात कसूर करून आरोपींना अभय देणाऱ्या असा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली होती. आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिलेला व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला असून हा व्हिडिओ दाखवत पोलिस आणि वाळू माफिया यांचे संबंध किती सुमधुर आहेत, याची प्रचिती आली, असे आमदार भोंडेकर यांनी म्हटले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलिस कसे पकडतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत काल मटण पार्टी करणाऱ्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दिलीप धावडे, खुशाल कोचे, राजेंद्र लांबट अशी या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे पार्टी करताना त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेले संभाषण मोठा धक्कादायक खुलासा करणारे आहे. ‘ही घटना म्हणजे चिल्लर आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे मी स्वतः उडविली आहेत. पण आपण ‘यांना’ सल्ला देणे म्हणजे घरावर गोटे आणण्यासारखे आहे’, असे एक पोलिस कर्मचारी सहकाऱ्यांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Bhandara Sand Mafiya
एसडीओंना वाचवायला गेलेला API सुद्धा जखमी, भंडारा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष..

या व्हिडिओने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू तस्करीसारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अशाच प्रकारे आरोपींना वाचवत असावे, असा लोकांचा समज आता दृढ होत चालला आहे. त्यामुळे हे प्रकरण शांत झाल्याचे बोलले जात असताना कडक शिस्तीचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वक्त्वव्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवनवीन मजेशीर खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com