Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हलचालींना वेग ? मंत्रीपदासाठी आमदारांची 'फिल्डिंग'

Maharashtra Politics : दिल्लीवारीनंतर फडणवीसांनी घेतल्या आमदारांच्या भेटी
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११ मे) लागला. न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी वाढल्याने आजच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तविली जात आहे.

फडणवीस शुक्रवारी (ता. १९) रात्रीच नागपूर दौऱ्यातून तातडीने दिल्ली गाठली. त्यानंतर ते शनिवारी (ता. २०) सकाळी पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले. फडणवीस शुक्रवारी रात्री मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठीच अचानक दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Raj thackeray On Shadow Cabinet : मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पुढं काय झालं? राज ठाकरे म्हणाले..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्ली दौऱ्यानंतर शनिवारी राज्यातील आमदारांच्या भेटी घेतल्या. यात जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांनी फडणवीस यांची भेट घेतली. काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची घरी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यामुळे सावनेरमध्ये आशिष देशमुख यांना भाजपकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Khadase demands separate khandesh: महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा; खडसेंनी अशी मागणी का केली?

दरम्यान, गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार २३ किंवा २४ मे रोजी होण्याची चर्चा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये होती. त्यानंतर आज फडणवीस यांची दिल्लीवारी आणि भाजपच्या आमदारांच्या भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगवले (Bharat Gogawale), संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमणराव पाटील तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या खात्याबाबतही चर्चा आहे.

भरत गोगवले यांना जलसंधारण, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याकडे परिवहन किंवा समाज कल्याण, बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Jalgaon APMC News News : जळगाव बाजार समिती सभापती निवडीत आघाडीतच घमासान; पण, भाजप-शिवसेनेच्या मदतीने झाला विजय

सध्या मंत्रिमंडळात १८ मंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला होता. त्यावेळी १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यातील ९ मंत्री भाजपचे तर ९ मंत्री शिंदे यांच्या गटाचे आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com