शिवसैनिक संतापले; प्रतिकात्मक खुर्चीचे केले दहन, 'बेशरम' बुके दिला अभियंत्याला भेट...

तालुक्यातील नादुरुस्त, खड्डेमय रस्ते व इतर तक्रारी संदर्भात शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
Devendra Godbole, Shivsena
Devendra Godbole, ShivsenaSarkarnama

नागपूर : आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय माथनी (मौदा) येथे तालुक्यातील नादुरुस्त, खड्डेमय रस्ते व इतर तक्रारी संदर्भात शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मौदा तालुक्यात प्रत्येक रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. रबडीवाला ते केसलापूर रस्त्याला पूर्णपणे खोल खड्डे पडले आहेत. रोज कोणीतरी दुचाकिस्वार पडत असतात. नवेगाव येथील पूल मागील चार वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. त्याठिकाणी आतापर्यंत अपघातात ४ मुलांनी आपला जीव गमावला आहे. रामटेक-मौदा रस्त्यावर रोज हजारो लोक प्रवास करतात. सदर रस्ताही पूर्णपणे नादुरुस्त आहे.

रात्री बेरात्री कंपनीत कामाला येणारे अनेक कामगार (Workers) पडून दुर्घटना घडल्या आहेत्. एकंदरीत पूर्ण तालुक्यात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. अनेकदा यावर आंदोलन करूनही मुजोर अधिकारी लक्ष देत नाहीचय सरकार निधी देत नाही. मंत्र्याचे दौरे असले की थातूर मातुर मलमपट्टी करण्यात येते. पण सामान्यांचा विचार कोणी करत नाही. या विषयावर आज देवेंद्र गोडबोले यांनी सार्वजनिक विभाग कार्यालावर धडक दिली.

अभियंता खोब्रागडे यांना बेशरमच्या झाडाच्या फुलांचा गुलदस्ता देऊन सत्कार केला व प्रतिकात्मक खुर्ची जाळून निषेध नोंदवीला. तसेच रस्त्याची सुधारणा झाली नाही तर पुन्हा आंदोलन उभारून अधिकाऱ्याचे तोंड काळे केले जाईल, असा इशारा देण्यात आला. आता प्रतिकात्मक खुर्ची जाळली पुढच्या वेळेस अधिकाऱ्याची खुर्ची जाळू, असाही इशारा यावेळी देवेंद्र गोडबोले यांनी दिला. तसेच उपस्थित पोलिस प्रशासनाला पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Godbole, Shivsena
अमित शहांच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी ‘यूपी’तील शिवसेना नेत्यांना लावले कामाला!

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर हटवार, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, नगरसेवक शिवराज माथुरकर, उपसभापती ज्ञानेश्वर चौरे, महिला सेना तालुकाप्रमुख नीता पोटफोडे, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय पंचबुधे, शहरप्रमुख जितू साठवणे, सरपंच भूमेश्वर चाफळे, हरिभाऊ मारबाते, धर्मेंद्र येळणे, उपतालुका प्रमुख दिनकर आंबीलडूके, अरविंद तांबूलकर, अरविंद तांबे, दुर्गेश थोटे, चेतन गोडबोले, बंटी हटवार, अनिकेत झोड, सुरज बोरकर, राजू वैद्य, पुंडलिक गिऱ्हिपूनजे, माजी उपसरपंच निर्मला वैद्य, मनीषा खेडकर, सरला दुपारे, निशा शिंदे, शोभाबाई चौधरी, उषा ढोणेकर, रंजना झोड, सुलचना शिंदे, राजू पत्रे, बंटी हटवार, सचिन तिघारे, दर्शन डहाके, विकास झाडे, प्रकाश अंबिलदुके, धर्मा बावनकुळे, दिलीप साठवणे, अक्षय साठवणे, घनश्यामजी ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, हरिओम पंचबुधे, शुभम वानखेडे, गुलाब चाफळे, सुनील महल्ले, चरण चरडे व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in